नवी दिल्ली : विविध करसवलती व मध्यम वेतनवाढी यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्या दोन वर्षांच्या काळात थेट करदात्यांच्या संख्येतील वृद्धी मंदावल्याचे समोर आले आहे. नोटाबंदीनंतर मात्र करदाता आधार (टॅक्सपेअर बेस) वाढण्याचे दिसून आले आहे.
प्राप्तिकर विभागाच्या आकडेवारीनुसार, २०१२-१३मध्ये ५४ लाख करदात्यांची भर पडली होती. तेथून पुढे सलग चार वर्षे वैयक्तिक करदात्यांची संख्या वाढतच होती. त्यानंतरच ही गती मंदावली. मोदी सरकार सत्तेवर येण्याआधीच्या वर्षी म्हणजेच २०१३-१४मध्ये वैयक्तिक करदात्यांची संख्या ५.४ कोटी होती. ती २०१५-१६मध्ये ५३ लाखांनी वाढून ५.९३ कोटी झाली.
मोदींच्या पहिल्या २ वर्षांत करदाता वृद्धी मंदावली
विविध करसवलती व मध्यम वेतनवाढी यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्या दोन वर्षांच्या काळात थेट करदात्यांच्या संख्येतील वृद्धी मंदावल्याचे समोर आले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:05 AM2017-12-23T01:05:54+5:302017-12-23T01:06:23+5:30