रेटिंग एजन्सी Fitchने गुरुवारी २२ जून रोजी चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी भारताला आनंदाची बातमी दिली आहे. भारताच्या जीडीपीच्या ग्रोथ रेटचा अंदाज ६ टक्क्यांवरुन ६.३ टक्के दिला आहे. याचा अर्थ फिचने पहिल्या अंदाजावर ०.३ टक्क्यांची वाढ केली. यापूर्वी फिचने भारताचा विकास दर सहा टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. याचा सरळ अर्थ असा आहे की भारताची अर्थव्यवस्था व्यापक आधारावर ताकद दाखवत आहे.
PPF खातं गोठवायचं नसेल तर डेडलाईनपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; पाहा डिटेल्स
जानेवारी-मार्च तिमाहीत चांगला विकास दर लक्षात घेता, फिच रेटिंग एजन्सीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज वाढवला आहे. याआधी, मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताचा विकास दर ७.२ टक्के होता. तर २०२१-२२ मध्ये देशाची अर्थव्यवस्था ९.१ टक्के दराने वाढली.
भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे यात म्हटले आहे. २०२३ च्या पहिल्या तिमाहित जानेवारी मार्चमध्ये वर्षाच्या आधारे ६.१ टक्के दराने वाढू शकते. नुकत्याच आलेल्या आकडेवारीत वाहन विक्रीची आकडेवारी चांगली आहे.
याशिवाय पीएमआय सर्वेक्षण आणि क्रेडिट वाढ देखील मजबूत आहे. चालू आर्थिक वर्षातील विकास दराचा अंदाज ०.३ टक्क्यांनी वाढवून ६.३ टक्के केला आहे, असंही यात म्हटले आहे.
मार्चच्या सुरुवातीला, उच्च चलनवाढ आणि उच्च व्याजदर आणि कमकुवत जागतिक मागणी लक्षात घेऊन फिचने २०२३-२४ साठी भारताचा वाढीचा अंदाज ६.२ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर कमी केला होता. २०२४-२५ आणि २०२५-२६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे, असे फिचने म्हटले आहे.
जानेवारी-मार्च तिमाहीत जीडीपी वाढीचा दर अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे रेटिंग एजन्सीने म्हटले आहे. याशिवाय उत्पादन क्षेत्राची स्थितीही दोन तिमाहींच्या घसरणीनंतर सुधारली आहे. खर्चाच्या दृष्टिकोनातून, जीडीपीच्या वाढीला देशांतर्गत मागणीचा आधार मिळेल.