Join us

भविष्यात पाचच बँकांचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2017 4:49 AM

आर्थिक सेवा क्षेत्रात बँकांचे एकीकरण होेईल आणि आगामी काळात भारतात फक्त पाचच बँकांचा दबदबा राहील

मुंबई : आर्थिक सेवा क्षेत्रात बँकांचे एकीकरण होेईल आणि आगामी काळात भारतात फक्त पाचच बँकांचा दबदबा राहील, असे मत कोटक बँकेचे महिंद्रा व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी व्यक्त केले आहे. कोटक म्हणाले की, जागतिक स्तरावरही तीन ते पाच बँकांचाच बाजारपेठेत दबदबा दिसतो. आगामी काळात भारतातही असेच चित्र दिसेल. देशात अशा कोणत्या बँका असतील? असा प्रश्न केला असता, कोटक यांनी बँकांची नावे सांगितली नाहीत, पण या बँकांत स्टेट बँकेचा समावेश असेल, असे ते म्हणाले. आर्थिक क्षेत्रात धाडसी आणि पूर्ण बदल घडवून आणणाऱ्या निर्णयासाठी आपण तयार असल्याचे कोटक यांनी सांगितले. (वाणिज्य प्रतिनिधी)>विलीनीकरणातून खूप काही शिकलोकोटक म्हणाले की, तुम्हाला असे वाटते का की, आम्ही थकलेलो आहोत? आम्ही विलीनीकरणातून खूप काही शिकलो आहोत. विलीनीकरणाकडे डोळे आणि कान उघडे ठेवून आम्ही या घटनांकडे बघत आहोत. आगामी काळात खासगी क्षेत्रात कर्ज देणाऱ्या संस्थांची भागीदारी २५ टक्क्यांनी वाढेल. आमची स्पर्धा सरकारी बँकांशीही असू शकते. त्यामुळे सावध राहावे लागेल. आगामी पतधोरणातून काय अपेक्षा आहेत? असा प्रश्न केला असता, ते म्हणाले की, यात जैसे थे परिस्थिती राहील.