नवी दिल्ली : चालू वित्तीय वर्षातील उर्वरित अवधीत सरकारी बँकांत केंद्र सरकार पाच हजार कोटी रुपयांचे भांडवल ओतणार आहे. या बँकांचे बॅलन्सशीट दुरुस्त करण्याचा सरकारचा त्यामागे उद्देश आहे.वित्तीय सेवा सचिव अजूली छिब दुग्गल यांनी येथे एका कार्यक्रमात सांगितले की, चौथ्या तिमाहीत बँकांत भांडवल ओतले जाईल, असे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानुसार बँकांना पाच हजार कोटी रुपये मिळतील. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तिसऱ्या अनुपूरक अनुदान मागण्यांना संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर या बँकांत भांडवल ओतले जाणार आहे.चार वर्षांत बँकात ७० हजार कोटींचे भांडवल ओतण्याच्या इंद्रधनुष्य योजनेत गेल्यावर्षी बदल करण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर बँकांना बासेल-३ च्या जागतिक धोक्याबाबतच्या निकषानुसार आपले भांडवल अनिवार्यतापूर्ण करण्यासाठी बाजारातून १.१ लाख कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत.सामाजिक सुरक्षा कक्षा वाढविण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत. त्याबाबत दुग्गल म्हणाले की, बँकांच्या शेवटच्या बिंदूपर्यंत जाऊन समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी वित्तीय सेवा विभाग बँकांसोबत नियमित आधारावर चर्चा करीत आहे.बँकांत भांडवल ओतण्याच्या रूपरेषेनुसार सरकारी बँकांना चालू वित्तीय वर्षात २५ हजार कोटी रुपये मिळतील.त्यातील २०,०८८ कोटी रुपये सरकारने यापूर्वीच १३ सरकारी बँकांत टाकले आहेत.याशिवाय २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये १० हजार कोटी रुपये बँकांत ओतले जाणार आहेत.
सरकारी बँकांना पाच हजार कोटी
By admin | Published: February 04, 2016 3:15 AM