बँक ऑफ इंडियाने दोन कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये बदल केला आहे. व्याजदरामध्ये झालेल्या बदलांनंतर सात दिवसांपासून १० वर्षांपर्यंतच्या फिक्स डिपॉझिट स्किमवर बँक आता ३.०० टक्के ते ६.०० टक्क्यांपर्यंत व्याज ऑफर करत आहे. एक वर्षामध्ये मॅच्युएर होणाऱ्या फिक्स डिपॉझिटवर कमाल सात टक्के दराने व्याज देत आहे. बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार फिक्स डिपॉझिटचा नवा व्याजदर हा २६ मे २०२३ पासून लागू होणार आहे.
बँक पुढच्या ७ ते ४५ दिवसांमध्ये मॅच्युअर होणाऱ्या डिपॉझिटवर तीन टक्क्यांच्या दराने व्याज ऑफर करत आहे. तर बँक पुढच्या ४६ ते १७९ दिवसांमध्ये मॅच्युअर होणाऱ्या डिपॉझिटवर ४.५०च्या दराने व्याज ऑफर करण्यात येत आहे. बँक ऑफ इंडिया १८० दिवसांपासून २६९ दिवसांची मॅच्युरिटी असलेल्या एफडीवर ५ टक्क्यांच्या दराने व्याज ऑफर करण्यात येत आहे. २७० दिवसांपासून ते एक वर्षांपर्यंतची मॅच्युरिटी असलेल्या एफडीवर बँक ५.५० टक्के व्याज देत आहे.
बँक ऑफ इंडिया डिपॉझिट्सवर सर्वाधिक व्याज एक वर्षामध्ये मॅच्युअर होणाऱ्या फिक्स डिपॉझिटवर देत आहे. या अवधीच्या एफडीवर सात टक्क्यांच्या दराने व्याज मिळते. तर एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आणि दोन वर्षांपेक्षा कमी अवधीत मॅच्युअर होणाऱ्या फिक्स डिपॉझिटवर बँक ६.०० टक्के दराने व्याज ऑफर कर आहेत.
बँक दोन वर्षांपासून तीन वर्षांपर्यंतच्या अवधीच्या एफडीवर ६.७५ टक्के दराने व्याज देत आहे. बँक ऑफ इंडिया तीन वर्षांपासून पाच वर्षांपेक्षा कमी अवधीच्या एफडीवर ६.५० टक्के व्याजदर देत आहे. सध्याच्या काळात बँक ५ ते १० वर्षांदरम्यान जमा असलेल्या रकमेवर ६.०० टक्के व्याजदर ऑफर करत आहे.
बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या रिटेल टर्म डिपॉझिटवर (२ कोटींपेक्षा कमी) सध्याच्या ५० बीपीएसशिवाय २५ बीपीएस अधिक व्याज मिळेल. हे व्याज दर तीन वर्षे आणि त्यापेक्षा अधिकच्या सर्व अवधीवर मिळेल. आता बँक ऑफ इंडिया तीन वर्षांच्या टीडीसाठी आपल्या ज्येष्ठ ग्राहकांना ७५ बेसिस पॉईंटचं व्याजदर सामान्यापेक्षा अतिरिक्त ऑफर करत आहे.