Lokmat Money > बिझनेस न्यूज > फ्लॅटस््चा आकार २६ टक्के घटला

फ्लॅटस््चा आकार २६ टक्के घटला

देशातील सात प्रमुख शहरांतील फ्लॅटस्च्या सरासरी आकारात २६ टक्क्यांची घट झाली आहे. जमीन व मालमत्तेच्या उद्योगात मंदी असल्यामुळे

By admin | Published: August 19, 2015 10:36 PM2015-08-19T22:36:27+5:302015-08-19T22:36:27+5:30

देशातील सात प्रमुख शहरांतील फ्लॅटस्च्या सरासरी आकारात २६ टक्क्यांची घट झाली आहे. जमीन व मालमत्तेच्या उद्योगात मंदी असल्यामुळे

Flat size decreased by 26 percent | फ्लॅटस््चा आकार २६ टक्के घटला

फ्लॅटस््चा आकार २६ टक्के घटला

नवी दिल्ली : देशातील सात प्रमुख शहरांतील फ्लॅटस्च्या सरासरी आकारात २६ टक्क्यांची घट झाली आहे. जमीन व मालमत्तेच्या उद्योगात मंदी असल्यामुळे बिल्डर्स आपली विक्री वाढावी म्हणून फ्लॅटस्चे आकार लहान करीत आहेत.
जागतिक पातळीवरील रियल्टी कंपनी जेएलएलने एका अहवालात ही माहिती दिली. बिल्डर्स फ्लॅटस्चा आकार लहान करीत असले तरी किमती मात्र कमी करीत नाहीत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अपार्टमेंटस्च्या आकारात वर्षाच्या आधारावर सगळ्यात जास्त घट झाली आहे.
बंगळुरू, चेन्नईदेखील याच वर्गात आहेत. दिल्ली, एनसीआर, हैदराबाद व पुण्यामध्येही फ्लॅटस्चे आकार कमी झाले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Flat size decreased by 26 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.