भारत सरकार आत्मनिर्भर बननण्यासाठी विविध योजनेवर काम करत आहे. यामुळे आता बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या इंधनारही पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींना पर्याय म्हणून फ्लेक्स-इंधनकडे पाहिले जात आहे. हे गॅसोलीन आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलचे मिश्रण करून तयार केले जाते. या प्रकारच्या इंधनामुळे पेट्रोलचा वापर कमी होतो. जे खर्चात कपात करण्यास मदत करेल. सध्या, जगातील अनेक देशांमध्ये फ्लेक्स इंधन इंजिन खूप लोकप्रिय आहेत.
Kotak बँकेनं लाँच केलं संकल्प सेव्हिंग अकाऊंट, कॅश डिपॉझिटवरही शुल्क नाही
भारत इथेनॉलचा पाचवा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. अहवालानुसार, सरकार आता २०२५ पर्यंत देशभरात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण उपलब्ध करून देणार आहे. फ्लेक्स इंधनामध्ये इथेनॉलचा अधिकाधिक वापर केला जात आहे, जेणेकरून भारतातील पेट्रोल आणि डिझेलची आयात कमी करता येईल. फ्लेक्स इंधन असलेली वाहने १०० टक्के पेट्रोल किंवा १० टक्के बायो-इथेनॉल आणि त्यांचे मिश्रण यांच्या मदतीने चालतात .
या इंधनावर चालणारी देशातील पहिली कार टोयोटा मोटरने सादर केली आहे, जी पूर्णपणे पर्यायी इंधन इथेनॉलवर धावू शकते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कार्यक्रमात त्याचे अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आले. गेल्या वर्षभरात जैवइंधन किंवा पर्यायी स्वच्छ इंधनासाठी भारताच्या प्रयत्नांना वेग आला आहे. केंद्राने २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल बाजारात आणले आहे. फ्लेक्स इंधन किंवा पर्यायी इंधन सरकारला कच्च्या तेलाची महागडी आयात कमी करण्यास मदत करेल. हे फ्लेक्स इंधन सादर करण्यामागे प्रदूषण कमी करण्याचाही उद्देश आहे.
फ्लेक्स इंधनाचे तंत्रज्ञान नवीन नाही. हे १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस विकसित केले. तज्ज्ञांच्या मते फ्लेक्स फ्युएलचे काही फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते कार्बन उत्सर्जन कमी करते. त्यामुळे प्रदूषण कमी होते. त्यामुळे इंधनाचा खर्च कमी होतो आणि इंजिन दीर्घकाळ चालते. यामुळे वाहनांची कार्यक्षमताही सुधारते.
तर दुसरीकडे, तोट्यांबद्दल बोलायचे तर, यामुळे मायलेजवर थोडासा परिणाम होऊ शकतो. मुख्य गैरसोय म्हणजे फ्लेक्स इंधन तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पीक इतरत्र कुठेही वापरता येत नाहीत.