Lokmat Money > बिझनेस न्यूज > Flight fare hike: ... म्हणून हवाई प्रवास ५,६०० रूपयांपर्यंत होणार महाग

Flight fare hike: ... म्हणून हवाई प्रवास ५,६०० रूपयांपर्यंत होणार महाग

Flight fare hike: पाहा काय आहे हा निर्णय आणि का होणार आहे दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 02:52 PM2021-02-12T14:52:19+5:302021-02-12T14:54:34+5:30

Flight fare hike: पाहा काय आहे हा निर्णय आणि का होणार आहे दरवाढ

Flight fare hike: Air travel to be costlier as Govt raises fare limits by up to 30 per cent | Flight fare hike: ... म्हणून हवाई प्रवास ५,६०० रूपयांपर्यंत होणार महाग

Flight fare hike: ... म्हणून हवाई प्रवास ५,६०० रूपयांपर्यंत होणार महाग

Highlightsउड्डाणांसाठी लोअर आणि अपर कॅपमध्ये १०-३० टक्क्यांची झाली वाढ मंत्रालयानं विमान प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेनुसार सात बँड तयार केले आहेत.

Flight fare hike: आता पुन्हा एकदा विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे. नागरी उड्डयण मंत्रालयानं गुरूवारी देशांतर्गत उड्डाणांसाठी लोअर आणि अपर कॅपमध्ये १०-३० टक्क्यांची वाढ केली आहे. मंत्रालयानं जे कॅपिंग जाहीर केलंय ते ३१ मार्चपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी २१ मे रोजी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या देशांतर्गत उड्डाणांना पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी मंत्रालयाकडून यावर कॅपिंग लावण्यात आलं होतं.

मंत्रालयानं विमान प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेनुसार सात बँड तयार केले आहेत. यामध्ये पहिला बँड ४० मिनिटांच्या प्रवासासाठी होता. त्याचं लोअर लिमिट २ हजार रूपये होतं ते वाढवून २२०० रूपये करण्यात आलं आहे. तर त्याचं अपर लिमिट ६ हजार रूपये होतं ते वाढवून ७८०० रूपये इतकं करण्यात आलं आहे. तर १८० ते २१० मिनिटाच्या विमान प्रवासाचं लिमिट ५६०० रूपयांनी वाढवण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त सध्या ८० टक्के देशांतर्गत उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. हे कॅपिंग मार्च २०२१ पर्यंत कायम राहणार आहे. 

काय आहे लिमिट?

  • ४० मिनिटांच्या प्रवासासाठी लोअर लिमिट २ हजार रूपयांवरून वाढवून २२०० रूपये आणि अपर लिमिट ६ हजारांवरून वाढवून ७८०० रूपये करण्यात आलं आहे. 
     
  • ४०-६० मिनिटांच्या फ्लाईट ड्युरेशनसाठी तिकिटाच्या दराचं लोअर लिमिट २५०० रूपयांवरून वाढवून २८०० रूपये करण्यात आलं आहे. तर अपर लिमिट ७५०० रूपयांवरून वाढवून ९८०० रूपये करण्यात आलं आहे. 
     
  • ६० ते ९० मिनिटांच्या प्रवासाचं लोअर लिमिट ३३०० रूपये करणअयात आलं आहे. तर अपर लिमिट हे ११७०० रूपये करण्यात आलंय. यापूर्वी ते ९ हजार रूपये होतं. 
     
  • ९० ते १२० मिनिटांच्या फ्लाईट ड्युरेशनसाठी विमानाच्या तिकिटांचं अपल लिमिट ५ हजार रूपये करण्यात आलं असून अपर लिमिटमध्येही जवळपास ४ हजारांची वाढ करण्यात आली आहे. आता यासाठी अपर लिमिट हे १६९०० रूपये असेल. 
     
  • १५० ते १८० मिनिटांच्या विमान प्रवासासाठी लोअर लिमिट ५५०० रूपयांवरून वाढवून ६१०० रूपये करण्यात आलं आहे. तर त्याचं अपर लिमिट १५७०० रूपयांवरून वाढवून २४००० रूपये करण्यात आलंय. 
     
  • १८० ते २१० मिनिटांपर्यंतच्या विमान प्रवासाचं लोअर लिमिट ६ हजारांवरून वाढवून ७२०० रूपये करण्यात आलं आहे. यापूर्वी याचं अपर लिमिट हे १८६०० रूपये इतकं होतं. तेदेखील वाढवून आता २४२०० रूपये करण्यात आलंय. 
     

Read in English

Web Title: Flight fare hike: Air travel to be costlier as Govt raises fare limits by up to 30 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.