Lokmat Money > बिझनेस न्यूज > Flight Ticket Offer : फक्त 100 रुपयांत विमानानं प्रवास करायची संधी! 50 लाख रुपयांपर्यंतचा फायदाही मिळणार

Flight Ticket Offer : फक्त 100 रुपयांत विमानानं प्रवास करायची संधी! 50 लाख रुपयांपर्यंतचा फायदाही मिळणार

आपल्याला 5 टक्के व्हॅल्यू बॅकही मिळेल. याशिवाय, जर आपण अमेरिकन एक्सप्रेस कार्डने पेमेंट करून विमानाचे तिकीट बूक केले, तर 7 टक्के इन्टेंट डिस्काउंट मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 02:11 PM2022-07-17T14:11:56+5:302022-07-17T14:25:14+5:30

आपल्याला 5 टक्के व्हॅल्यू बॅकही मिळेल. याशिवाय, जर आपण अमेरिकन एक्सप्रेस कार्डने पेमेंट करून विमानाचे तिकीट बूक केले, तर 7 टक्के इन्टेंट डिस्काउंट मिळेल.

Flight Ticket Offer: Opportunity to travel by plane for only 100 rupees You will also get a benefit of up to 50 lakh rupees | Flight Ticket Offer : फक्त 100 रुपयांत विमानानं प्रवास करायची संधी! 50 लाख रुपयांपर्यंतचा फायदाही मिळणार

Flight Ticket Offer : फक्त 100 रुपयांत विमानानं प्रवास करायची संधी! 50 लाख रुपयांपर्यंतचा फायदाही मिळणार

जर आपण विमानाने प्रवास करायचा विचार करत असाल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. आता आपण अत्यंत कमी खर्चात विमानाने प्रवास करू शकता. कारण IRCTC वरून तिकिट बुकिंग केल्यास चांगली ऑफर मिळत आहे. येथे आपण केवळ 100 रुपयांत विमानाचे तिकीट बूक करू शकता. याच बरोबर आपल्याला 50 लाख रुपयांपर्यंतच्या इन्शुरन्सचाही लाभ घेता येईल. तर जाणून घेऊयात, या ऑफर संदर्भात...

अशा प्रकारे मिळू शकतो ऑफरचा फायदा -
आपण IRCTC च्या वेबसाइटवरून अथवा IRCTC Air App च्या माध्यमाने विमानाचे तिकीट बुक केले, तर आपल्याला इतरही अनेक बेनिफिट्स मिळू शकतील. IRCTC एअर वेबसाइटनुसार, जर आपण SBI Card Premier च्या माध्यमाने पेमेंट केले, तर आपल्याला 5 टक्के व्हॅल्यू बॅकही मिळेल. याशिवाय, जर आपण अमेरिकन एक्सप्रेस कार्डने पेमेंट करून विमानाचे तिकीट बूक केले, तर 7 टक्के इन्टेंट डिस्काउंट मिळेल. ही ऑफर 30 जुलैपर्यंत आहे. तसेच, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला बुधवारी बुकिंग करावी लागेल.

- IRCTC अॅप अथवा वेबसाइटच्या माध्यमाने तिकिट बूक केल्यास, 59 Convenience फीस लागते.
- आपण IRCTC च्या माध्यमाने तिकिट बूक केल्यास, आपल्याला 50 लाख रुपयांपर्यंतची फ्री ट्रॅव्हल इन्शुरेन्सची सुविधाही मिळेल.
- IRCTC इतर अनेक प्रकारच्या ऑफर्स आणि सूटही देते. 
- LTC तिकिट बुकिंगसाठी वेगळी सरकार प्रमाणित कंपनी आहे.
- विशेष डिफेंस किरायातही IRCTC सूट देते. 

असं बुक करा तिकिट - 
- तिकिट बूक करण्यासाठी सर्व प्रथम https://www.air.irctc.co.in/ वर व्हिजिट करा.
- नंतर आपल्या आयडीने लॉगइन करा.
- यानंतर प्रस्थान आणि आगमन जागा भरा.
- यानंतर ऑफर्स चेक केल्यानंतर, पेमेंट ऑप्शन निवडडा.
- यानंतर, आपले विमान तिकीट बुक करा.
 

Web Title: Flight Ticket Offer: Opportunity to travel by plane for only 100 rupees You will also get a benefit of up to 50 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.