Join us  

सरकारचा मोठा निर्णय, आता विमान प्रवास महाग होणार; जाणून घ्या, किती होईल दरवाढ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 5:09 PM

flight tickets : सध्या विमान कंपन्यांची उड्डाण क्षमता ६५ टक्क्यांवरून ७२.५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

नवी दिल्ली : विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. लवकरच विमानाने प्रवास करणे महाग होणार आहे. याबाबतची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने (civil aviation ministry) देशांतर्गत विमान भाड्यातील (domestic airfares) कमाल आणि किमान मर्यादेचा हिस्सा १२.५ टक्क्यांनी वाढविला आहे. मंत्रालयाने भाड्यावरील लोअर आणि अप्परची मर्यादा ( lower and upper caps ) ९.८३ वरून १२.८२ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. (flight tickets to get costlier government hikes domestic airfares flights permitted)

गेल्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर २५ मे २०२० रोजी सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या तेव्हा सरकारने देशांतर्गत विमानभाड्यावर लोअर आणि अप्परची मर्यादा घातली होती. मात्र, आता परिस्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आहे आणि एअरलाइन्स कंपन्या अधिक क्षमतेने उड्डाण करीत आहेत. 

अलीकडे ग्राहकांच्या चांगल्या भावनेमुळे देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी सुधारू लागल्याने सरकारने देशांतर्गत विमान कंपन्यांना अधिक क्षमतेने उड्डाण करण्याची परवानगी दिली आहे. सध्या विमान कंपन्यांची उड्डाण क्षमता ६५ टक्क्यांवरून ७२.५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

तिकीट किती महाग होईल?१२ ऑगस्ट २०२१ रोजीच्या आदेशात मंत्रालयाने ४० मिनिटांच्या कालावधीत उड्डाणांची लोवर मर्यादा ११.५३ टक्क्यांच्या वाढीसह २,६०० रुपयांवरून २,९०० रुपये केली. तर ४० मिनिटांच्या कमी उड्डाणांसाठी अप्पर मर्यादा १२.८२ टक्क्यांनी वाढवून ८,८०० रुपये करण्यात आली. त्याचप्रमाणे ४०-६० मिनिटांचा कालावधी असलेली उड्डाणे आता ३,३०० रुपयांऐवजी ३,७०० रुपये आहेत. या उड्डाणांची अप्पर मर्यादा १२.२४ टक्क्यांनी वाढवून ११,००० रुपये करण्यात आली.आता मंत्रालयाच्या आदेशानुसार ९०-१२०, १२०-१५०, १५०-१८० आणि १८०-२१० मिनिटांच्या देशांतर्गत उड्डाणांमध्ये अनुक्रमे ५,३००, ६,७००, ८,३०० आणि ९,८०० रुपयांची लोअर कॅप आहे.

टॅग्स :विमानविमानतळव्यवसाय