Online Shopping Festivale : तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगची आवड आहे का? खरंतर हा प्रश्नचं चुकीचा आहे. तुम्ही कुठल्या ई कॉमर्स साईटवरुन खरेदी करता? कारण, सध्या दिग्गज ई कॉमर्स कंपन्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने आपल्या वर्षातील सर्वात मोठ्या सेल्स ऑफरला सुरुवात केली आहे. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days sale) आणि अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल (Amazon Great Indian Festival sale) आज २७ सप्टेंबरपासून लाइव्ह करण्यात आला आहे. तर फ्लिपकार्ट प्लस आणि ॲमेझॉन प्राइम सदस्यांसाठी हा सेल एक दिवस आधी म्हणजेच २६ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला होता.
या दोन्ही प्लॅटफॉर्मने ग्राहकांसाठी ऑफर्सचा पाऊस पाडला आहे. प्रत्येक प्रॉडक्टवर बंपर सूट देण्यात आली आहे. दोन्ही कंपन्यांच्या ऑफर्स पाहून कुठून खरेदी करू अशा संभ्रमात तुम्हीही पडला असाल तर काळजी करू नका. आम्ही तुमचा संभ्रम दूर करणार आहोत. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल किंवा ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये खरेदी करून तुम्ही कोणत्या सेलमध्ये अधिक बचत करू शकता ते जाणून घेऊ.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल २०२४
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप आणि होम अप्लायन्सेसवर ६० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. या सेलमध्ये कपडे, शूज आणि इतर ॲक्सेसरीजवर ७० टक्क्यांपर्यंत सूट आहे. याशिवाय किचन अप्लायन्सेस, फर्निचर आणि होम डेकोर यांसारख्या गोष्टींवर ५० टक्क्यांपर्यंत सूट आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे तर, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये HDFC बँक कार्ड्सवर १० टक्के इस्टंट सूट दिली जात आहे.
ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेल २०२४
ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप आणि होम अप्लायन्सेसवर ६० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. या सेलमध्ये कपडे, शूज आणि इतर ॲक्सेसरीजवर ७० टक्क्यांपर्यंत सूट आहे. याशिवाय किचन अप्लायन्सेस, फर्निचर आणि होम डेकोर यांसारख्या गोष्टींवर ५० टक्क्यांपर्यंत सूट आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेलमध्ये SBI बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर १० टक्के झटपट सूट दिली जात आहे.
आता निर्णय कसा घ्यावा?
दोन्ही प्लॅटफॉर्मचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल की जवळपास सारख्याच ऑफर्स मिळत आहे. अशात तुम्हाला जे प्रॉडक्ट घ्यायचं आहे, त्याची दोन्ही ठिकाणी किंमत पाहा. जिथे तुम्हाला चांगली सवलत मिळत असेल. तिथे तुम्ही खरेदी करू शकता. यामध्ये बँक कार्डद्वारे १० टक्के सूट देण्यात येत आहे. यापैकी तुमच्याकडे कोणतं बँक कार्ड आहे? याचाही तुम्ही विचार करू शकता. तुमच्याकडे यापैकी कार्ड नसेल तर तुम्ही एखाद्या मित्राचंही वापरू शकता. कुठलीही वस्तू घेण्याआधी इतर वेबसाईट्सवरही त्याची किंमत तपासा. म्हणजे तुम्हाला खरच किती डिस्काउंट मिळत आहे, हे माहिती होईल.