Join us  

Flipkart Big Diwali Sale ला आजपासून सुरूवात, या iPhones वर बंपर सूट; मिस करू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 11:15 AM

Flipkart Big Diwali Sale ला सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक वस्तू कमी किंमतीत विकली घेण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. सेलदरम्यान बंपर डिस्काउंटसह स्मार्टफोन्सचीही विक्री केली जात आहे.

फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलला सुरूवात झाली आहे. आजपासून सुरू झालेला हा सेल 16 ऑक्टोबरला संपेल. अशा परिस्थितीत तुम्ही बंपर डिस्काउंटसह अनेक वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीचा दावा आहे की या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंटसह विकल्या जात आहेत.

Flipkart Big Diwali Sale दरम्यान, आयफोनच्या अनेक मॉडेल्सवर बंपर डिस्काऊंट दिला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्याकडे आयफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या सेलमध्ये iPhone13 60 हजारांपेक्षा कमी किंमतीत विकला जात आहे. फ्लिपकार्टवर iPhone13 59,990 रूपयांना लिस्ट करण्यात आलाय. याशिवाय कंपनी यावर बँक डिस्काऊंटदेखील ऑफर करत आहे.

बँक डिस्काऊंटनंतर हा फोन तुम्हाला आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसंच एक्सचेंज ऑफर अंतर्गत हा फोन तुम्ही आणखी कमी किंमतीत खरेदी करू शकाल. iPhone12 मिनी देखील या सेलदरम्यान स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. सेलदरम्यान हा फोन 33,740 रूपयांना लिस्ट करण्यात आलाय. तर दुसरीकडे iPhone11 वर देखील मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. वेबसाईटवर हा स्मार्टफोन 35,990 रूपयांना लिस्ट करण्यात आला आहे. या फोनवर बँक डिस्काऊंटदेखील दिला जात आहे. दरम्यान, हे मॉडेल जुनं असल्यानं खरेदी करण्यापूर्वी नक्की विचार केला पाहिजे.

टॅग्स :फ्लिपकार्टदिवाळी 2021