नवी दिल्ली - ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांची जय्यत तयारी सुरू आहे. फ्लिपकार्टवरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. कारण फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी खास सेल सुरू करणार आहे. स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर हा सेल बेस्ट आहे. यामध्ये ग्राहकांना विविध कंपनीच्या स्मार्टफोन खरेदीवर भरघोस सूट देण्यात आली आहे. फ्लिपकार्टनेही 23 ते 27 जून दरम्यान Big Saving Days ची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना जबरदस्त ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
फ्लिपकार्टने स्मार्टफोन्सवर बंपर सूट देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक कंपन्याच्या स्मार्टफोनवरही डिस्काउंटसह मोठी कॅशबॅक ऑफर तसेच एक्सेंज ऑफर देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर HDFC बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून शॉपिंग केल्यास 10 टक्के इंस्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. पाच दिवसांच्या या सेलमध्ये Google Pixel, Motorola, iPhone यासारख्या स्मार्टफोनवर दमदार सूट देण्यात आली आहे. फोन घेणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.
Flipkart Plus असलेल्यांसाठी Big Saving Days सेल एक दिवस आधी म्हणजे 22 जून रोजी संध्याकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. तसेच फ्लिपकार्टने नो-कॉस्ट EMI चा ऑप्शनही दिला आहे. फ्लिपकार्टवर मोटोरोलाच्या फोल्डेबल फोनवर तब्बल 25 हजारांची सूट मिळणार आहे. तसेच गुगलचा Pixel 3a स्मार्टफोन 29,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच मोटोरोलाने One Fusion+ आणि Spark Power 2 सारख्या फोनच्या सेलचंही आयोजन करण्यात आलं आहे.
थरकाप उडवणारा हा व्हिडीओ पाहिलात का?https://t.co/vSs3pOeEGD#SocialMedia#viralvideo
— Lokmat (@MiLOKMAT) June 19, 2020
CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनाच्या आकडेवारीने मोडला रेकॉर्डhttps://t.co/5h70lQKdvP#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 19, 2020
महत्त्वाच्या बातम्या
कोरोना संकटात राम कदम यांचा दहीहंडीबाबत महत्त्वाचा निर्णय
हत्या की आत्महत्या? पुण्यापाठोपाठ 'या' शहरात 6 जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ
खतरनाक! डोंगराच्या टोकावर उभं राहून त्याने मारली बॅक फ्लिप अन्...; Video जोरदार व्हायरल
CoronaVirus News : धडकी भरवणारी आकडेवारी! देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक
"पंडित नेहरूंना दोष देणार्यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!"
ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला; सरकारसह खासगी क्षेत्रालाही फटका
Sushant Singh Rajput Suicide: 'सच्चा मित्र गमावला', सुशांतच्या निधनाने इस्रायल झालं भावूक