Join us  

फ्लिपकार्टच्या सीईओनी खरेदी केले ३२ कोटींचे घर

By admin | Published: June 23, 2016 7:30 PM

फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि सीईओ बिनी बन्सल यांनी सर्वांत मोठी खरेदी केली आहे. त्यांनी येथील कोरामंगाला या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या महागड्या खरेदी केली आहे.

ऑनलाइन लोकमतबंगळुरु, दि. २३ - फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि सीईओ बिनी बन्सल यांनी सर्वांत मोठी खरेदी केली आहे. त्यांनी येथील कोरामंगाला या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या महागड्या घराची खरेदी केली आहे.

या घराची किंमत ३२ कोटींच्या घरात असून ते १०,००० स्केअर फूट आहे. तसेच,  आत्ताचे घर नऊ वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेल्या फ्लिपकार्टच्या ऑफिसपासून जवळच आहे. ३२ वर्षीय बिनी बन्सन हे बंगळुरु सारखा टेकसिटीत गेल्या काही दिवसात महागड्या घराची डील करणारे एकमेक व्यक्ती आहे.

कोरामंगाला या ठिकाणी अनेक नामांकित कंपनींच्या मालकांची आणि अधिका-यांची घरे आहेत. तसेच, फ्लिपकार्टचे दुसरे सहसंस्थापक सचिन बन्सल यांची सुद्धा या ठिकाणी प्रॉपर्टी आहे.