Join us

Flipkart ने सुरू केली 'हेल्थ प्लस' सेवा; प्रिस्क्रिप्शनमधील औषधे मिळणार घरपोच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 1:59 PM

हेल्थ प्लस सेवेवर ग्राहकांना औषधे तसेच अनेक प्रकारची आरोग्य सेवा उत्पादने मिळतील...

आता देशातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवरून डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमधील औषधेही मागवता येणार आहेत. मंगळवारी फ्लिपकार्टने याबद्दलची माहिती दिली. त्यामध्ये सांगितले की, हेल्थ प्लस (Flipkart Health+) सेवेद्वारे देशात कोठूनही औषधे मागवली जाऊ शकतात. यासाठी कंपनीने आपले अॅप अजून युजर फ्रेंडली बनवले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हेल्थ प्लस सेवेवर डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अपलोड करून औषधे मागवली जाऊ शकतात. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हेल्थ प्लस सेवेवर ग्राहकांना औषधे तसेच अनेक प्रकारची आरोग्य सेवा उत्पादने मिळतील.

फ्लिपकार्ट ही देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. ही कंपनी फॅशनपासून ते किराणा मालापर्यंत उत्पादनांचा पुरवठा करते. कंपनीने काही महिन्यांपूर्वी ऑनलाइन फार्मसी 'सस्तासुन्दर' (sastasundar) विकत घेतली आहे. त्यानंतर कंपनीने हेल्थ प्लस सेवा सुरू केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हेल्थ प्लस सेवेद्वारे देशातील लोकांना कमी किमतीत औषधे आणि आरोग्य सेवा उत्पादने उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.

ई-फार्मसी व्यवसायात मोठी वाढ-

देशातील इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवसायातही मोठी वाढ झाली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांवर नजर ठेवणारी वेबसाइट IBEF च्या अहवालानुसार, अलीकडच्या काही दिवसांत जागतिक स्तरावर ई-फार्मसी व्यवसायात 40-45% वाढ होण्याची अपेक्षा आहे.

दुर्गम भागातही दिली जाणार हेल्थ प्लस सेवा-

फ्लिपकार्ट हेल्थ+ सीईओ प्रशांत झवेरी म्हणाले की, फ्लिपकार्ट हेल्थ+ आणि फ्लिपकार्ट अॅपद्वारे लाखो भारतीयांना परवडणाऱ्या किमतीत औषधे उपलब्ध करून देण्याच्या जवळ आहे. कंपनीच्या संपूर्ण देशभरातील पुरवठा प्रणालीचा ग्राहकांना फायदा होईल आणि त्याच्याकडून ऑर्डर देण्यात येईल. औषधे आणि आरोग्य सेवा उत्पादने कमी वेळेत मिळू शकतील. यासोबतच देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी आरोग्य उत्पादनांचा वापर सुलभ होईल.

टॅग्स :पुणेऔषधंवैद्यकीयफ्लिपकार्ट