Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'फ्लिपकार्ट'सोबतच्या भागीदारीमुळे पुण्यातील कंपनीसाठी B2C मार्केटच्या संधी खुल्या; B2B बिझनेसही वाढला

'फ्लिपकार्ट'सोबतच्या भागीदारीमुळे पुण्यातील कंपनीसाठी B2C मार्केटच्या संधी खुल्या; B2B बिझनेसही वाढला

महामारीच्या कालावधीत 'ॲक्युमेन टुडे'ला फ्लिपकार्टकडून मोठं पाठबळ मिळालं. ॲक्युमेन टुडेच्या टीमला फ्लिपकार्टकडून आयोजित करण्यात येत असलेल्या अनेक वेबिनार आणि ग्राहक जागरुकतेच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 02:03 PM2021-11-30T14:03:59+5:302021-11-30T14:06:50+5:30

महामारीच्या कालावधीत 'ॲक्युमेन टुडे'ला फ्लिपकार्टकडून मोठं पाठबळ मिळालं. ॲक्युमेन टुडेच्या टीमला फ्लिपकार्टकडून आयोजित करण्यात येत असलेल्या अनेक वेबिनार आणि ग्राहक जागरुकतेच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.

Flipkart opened up the B2C market and boosted B2B business for Pune based learning company | 'फ्लिपकार्ट'सोबतच्या भागीदारीमुळे पुण्यातील कंपनीसाठी B2C मार्केटच्या संधी खुल्या; B2B बिझनेसही वाढला

'फ्लिपकार्ट'सोबतच्या भागीदारीमुळे पुण्यातील कंपनीसाठी B2C मार्केटच्या संधी खुल्या; B2B बिझनेसही वाढला

देश कोविड-१९ महामारीचा सामना करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारताची गरज अधोरेखित केली. याच हेतूनं अतुल बेंगेरी नावाच्या उद्योजकानं 'ॲक्युमेन टुडे'ची सुरुवात केली. संकल्पनात्मक विचार, शिक्षण आणि ॲप्लिकेशन यांच्यावर लक्ष केंद्रीत करून शैक्षणिक संसाधनं डिझाईन करण्याच्या उद्देशानं दोन वर्षांपूर्वी 'ॲक्युमेन टुडे'ची सुरुवात झाली. 'ॲक्युमेन टुडे' पूर्व प्राथमिक ते प्राथमिक आणि माध्यमिक स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीनं शिक्षण देणारी एड्युटेक कंपनी आहे.

विद्यार्थ्याच्या/विद्यार्थिनीच्या गतीनं, त्याच्या/तिच्या घरी शिकण्यास अनुकूल वातावरण देणं कंपनीचं प्रमुख उद्दिष्ट आहे. सहजसोप्या, अर्थपूर्ण पद्धतीनं SiMeCoReTM मेथडोलॉजीच्या माध्यमातून संकल्पनात्मक शिक्षण देण्यावर त्यांचा भर आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार संकल्पनात्मक शिक्षण देणाऱ्या उत्पादनांची निर्मिती 'ॲक्युमेन टुडे'कडून केली जाते. 'ॲक्युमेन टुडे'कडे 3-आय (इंटिग्रेटेड-इंटरकनेक्टेड-इंटररिलिटेड) मेथडोलॉजीसोबत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सीनियर केजीसाठी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणासह अर्ली चाईल्डहूड केअर अँड एज्युकेशन (ईसीसीई) सेगमेंटमध्येदेखील उपलब्ध आहे. शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या शाळा, शिक्षक आणि संस्था यांच्यासोबत काम करत असताना कंपनी फ्लिपकार्टच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचते. टार्गेट मार्केट वाढवण्याच्या दृष्टीनं बीटूसी मॉडेल निवडण्यात आलं.

आम्ही फ्लिपकार्टवर येताच लोकांना आमच्या उत्पादनांबद्दल अधिक विश्वास वाटू लागल्याचं अतुल सांगतात. फ्लिपकार्टमुळे व्हिजिबिलिटी आणि ग्राहकांचा विश्वास वाढला. फ्लिपकार्ट बीटूसी मॉडेलवर काम करतं. ग्राहक आणि विक्रेता यांच्यातील मध्यस्थ म्हणून फ्लिपकार्ट काम करतं. 

'ॲक्युमेन टुडे' हायब्रीड बिझनेस मॉडेलचा वापर करते. बीटूबी ऑफलाईन बिझनेस आणि बीटूसी ऑनलाईन बिझनेस मॉडेलचा वापर 'ॲक्युमेन टुडे'कडून केला जातो. कोविड-१९ महामारी आणि लॉकडाऊनचा ब्रँडच्या ऑपरेशनवर गंभीर परिणाम झाला. जवळपास चार महिने व्यवसाय ठप्प होता. जुलैपासून सर्व पूर्ववत झालं आणि विक्रीचा वेग वाढू लागला. या कालावधीत 'ॲक्युमेन टुडे'ला फ्लिपकार्टकडून मोठं पाठबळ मिळालं. अतुल आणि त्यांच्या टीमला फ्लिपकार्टकडून आयोजित करण्यात येत असलेल्या अनेक वेबिनार आणि ग्राहक जागरुकतेच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या सत्रांमुळे त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल निश्चिंत राहण्यास मदत झाली. 

महामारीचा परिणाम निश्चितपणे व्यवसायावर झाला. मात्र या कालावधीत ब्रँडला अधिक जागरुक होता आलं. संकल्पनात्मक पुस्तकांसोबत आता त्यांनी ३ नवी ॲप तयार केली आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये कंपनीनं फ्लिपकार्टवर व्यवसाय सुरू केला. त्यावेळी कंपनीच्या उत्पादनांची संख्या ७ होती. आता  ती ३० च्या वर गेली आहे. मागणीत होत असलेली सातत्यपूर्ण वाढ आणि शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आणि वार्षिक सुट्टीच्या आधी वाढणाऱ्या मागणीमुळे हे शक्य झालं आहे. 

फ्लिपकार्टसोबच्या सहकार्यामुळे कंपनीसाठी केवळ महसुलाचा पर्यायच उपलब्ध झालेला नाही, तर यामुळे कंपनीचा बीटूबी व्यवसायदेखील वाढला आहे. यातून कंपनीला सातत्यानं मोठा महसूल मिळत आहे. व्यवसाय पूर्ववत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असतानाच कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचीही तितकीच काळजी घेते. ऑर्डर्सची पूर्तता करण्यासाठी कार्यालयात दोन ते तीन कर्मचारी हजर असतात. सॅनिटाईज्ड स्थितीत आणि देण्यात आलेल्या सुचनांनुसारच पॅकेजिंग करण्यात येतं. फ्लिपकार्टनं आपला पिकअप टाईम वाढवून ऑर्डर डिस्पॅचसाठी तयार ठेवता यावी म्हणून दोन अतिरिक्त दिवस दिले आहेत. ब्रँडला फ्लिपकार्टकडून मिळत असलेल्या सहकार्यामुळे त्यांना आत्मनिर्भर होण्यास, शैक्षणिक क्षेत्रातील प्रणेते होण्यास मदत होत आहे.

Web Title: Flipkart opened up the B2C market and boosted B2B business for Pune based learning company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.