Lokmat Money > बिझनेस न्यूज > Flipkart च्या बिन्नी बन्सल यांनी लॉन्च केलं OppDoo, ई-कॉमर्स कंपन्यांची करणार मदत

Flipkart च्या बिन्नी बन्सल यांनी लॉन्च केलं OppDoo, ई-कॉमर्स कंपन्यांची करणार मदत

फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांनी त्यांचा नवीन व्हेन्चर लॉन्च केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 04:03 PM2024-01-02T16:03:13+5:302024-01-02T16:03:36+5:30

फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांनी त्यांचा नवीन व्हेन्चर लॉन्च केलं आहे.

Flipkart s Binny Bansal launches OppDoo new venture to help e commerce companies after sale stakes to Walmart | Flipkart च्या बिन्नी बन्सल यांनी लॉन्च केलं OppDoo, ई-कॉमर्स कंपन्यांची करणार मदत

Flipkart च्या बिन्नी बन्सल यांनी लॉन्च केलं OppDoo, ई-कॉमर्स कंपन्यांची करणार मदत

फ्लिपकार्टचे (Flipkart) सह-संस्थापक बिन्नी बन्सल (Binny Bansal) यांनी त्यांचा नवीन व्हेन्चर OppDoor लॉन्च केलं आहे. हे स्टार्टअप ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांचे काम जागतिक स्तरावर वाढविण्यात मदत करेल आणि त्यांना एंड टू एंड सोल्युशन पुरवेल.

बिन्नी बन्सल यांनी कंपनीच्या वेबसाइटवर या नवीन स्टार्टअपबद्दल पुष्टी केली आहे. OppDoor च्या वेबसाइटनुसार कंपनी विविध प्रकारच्या सेवा पुरवते. वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, OppDoor च्या सेवा ब्रँडच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंतच्या आवश्यक सर्व सेवा पुरवतात. कंपनी पूर्णपणे मॅनेज केलेल्या ऑपरेशन्स आणि बिझनेस अॅडव्हायझरी अशा दोन्ही सेवा प्रदान करत असल्याचं वेबसाईटवर नमूद करण्यात आलंय.

५ वर्षांनंतर एन्ट्री
मनी कंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार OppDoor हे बिन्नी बन्सल यांचं नवीन स्टार्टअप असल्याची पुष्टीही सूत्रांनी केली आहे. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी फ्लिपकार्टमधील त्यांचे स्टेक विकून पाच वर्षांनंतर OppDoor लाँच करण्याची वेळ महत्त्वाची आहे.

या दोघांनी आपले स्टेक वॉलमार्टला विकले होते. वास्तविक, २०२३ मध्ये संपलेल्या वॉलमार्टसोबतच्या डीलमध्ये ५ वर्षांचा नॉन कम्पिट क्लॉजदेखील होता. यानंतर बिन्नी बसल पुन्हा ई-कॉमर्स क्षेत्रात स्टार्टअप सुरू करू शकणार होते.

Web Title: Flipkart s Binny Bansal launches OppDoo new venture to help e commerce companies after sale stakes to Walmart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.