>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - सोशल मिडीयातील ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने 'बिग बिलियन डेज्' असा एक वस्तू विक्री करण्याठी फेस्टीव्हल सुरु केला आहे. या फेस्टीव्हलमध्ये आजच्या दिवशी अवघ्या १० तासात १० लाख वस्तूंची विक्री केल्याचा दावा फ्लिपकार्टने केला आहे.
फ्लिपकार्ट या साइटवर वस्तूंची खरेदी करण्यासाठी देशभरातून जवळजवळ ६० लाख युजर्संनी भेट दिली. यावेळी प्रत्येक सेकंदाला २५ वस्तू विकल्या गेल्या. देशातील मेट्रो सिटीतून बंगळुरु, दिल्ली आणि चेन्नईमधील ग्राहकांनी मोठ्याप्रमाणात भेट दिली, तर नॉन मेट्रो सिटीतून लुधियाना, लखनऊ आणि भोपाळ येथीलही ग्राहकांनीही चांगला प्रतिसाद दिल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे.
फ्लिपकार्ट साइटवरुन जास्त करुन पादत्राणे, कपडे आणि एक्सेसरींज यांची मोठ्याप्रमाणात ग्राहकांकडून खरेदी करण्यात आली. तसेच, फॅशनच्या वस्तूंचीही जास्त खरेदी ग्राहकांनी केली असून आज १० तासात जवऴजवळ १० लाखाची वस्तूंची विक्री झाली असल्याचे फ्लिपकार्टने सांगितले.