Lokmat Money > बिझनेस न्यूज > फ्लिपकार्टचे 2GUD आले; रिफर्बिश्ड वस्तू विक्रीला

फ्लिपकार्टचे 2GUD आले; रिफर्बिश्ड वस्तू विक्रीला

स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट्स अशा 400 हून अधिक दुरुस्त केलेली उत्पादने उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 07:26 PM2018-08-23T19:26:42+5:302018-08-23T19:27:41+5:30

स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट्स अशा 400 हून अधिक दुरुस्त केलेली उत्पादने उपलब्ध होणार

Flipkart's 2GUD came; Referbished goods will be on sale | फ्लिपकार्टचे 2GUD आले; रिफर्बिश्ड वस्तू विक्रीला

फ्लिपकार्टचे 2GUD आले; रिफर्बिश्ड वस्तू विक्रीला

नवी दिल्ली: सुरुवातीला अॅमेझॉनच्या साथीने भारतीय बाजारात उतरलेल्या फ्लिपकार्टने वेगळी वाट चोखाळल्यानंतर आता जुन्या परंतू नुतनीकृत केलेल्या उत्पादनांच्या विक्रीचे पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलचे नाव 2GUD असे ठेवण्यात आले आहे. या नव्या प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट्स अशा 400 हून अधिक दुरुस्त केलेली उत्पादने उपलब्ध होणार आहेत. 


या उत्पादनांची किंमत एमआरपीपेक्षा 50 ते 80 टक्के कमी असणार आहे. या पोर्टलव्दारे टिअर-2 च्या शहरांमध्ये फ्लिपकार्ट लक्ष पुरविणार आहे. कंपनीचे कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, रिफर्बिष्ड मार्केट विखुरलेले आहे. ते नीट करायचे आहे. 

या वेबसाईटवर आयफोन 10 हजारापासून सुरु होणार आहेत. तर तीन ते 12 महिन्यांची वॉरंटीही दिली जाणार आहे.


फ्लिपकार्टने 2017 मध्य़े 1.4 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला होता. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, टेन्सेंट आणि इबे या कंपन्या सहभागी होत्या. तर इबे ने फ्लिपकार्टमध्ये 220 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली होती. परंतू, वॉलमार्टने फ्लिपकार्टसोबत व्यवहार केल्यानंतर इबेने माघार घेत भारतात नव्या स्वरुपात इबे लाँच केले जणार असल्याचे सांगितले.


तरीही इबेचे एनेक सदस्य फ्लिपकार्टची नवी वेबसाईट 2GUD च्या टीमसोबत जोडलेले आहेत. 2GUDवर विकली जाणारी उत्पादने एकतर विक्रेते नवी करून विकणार आहेत किंवा तिऱ्हाईताकडून ती दुरुस्त करून घेतली जाणार आहेत. सध्या ही साईट मोबाईलवर उपलब्ध आहे. लवकरच या वेबसाईटला डेक्सटॉपवर लाँचे केले जाणार आहे. 

Web Title: Flipkart's 2GUD came; Referbished goods will be on sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.