Join us  

फ्लिपकार्टचा कोट्यवधी ग्राहकांना धक्का, या युझर्ससाठी सामान मागवणे महागले, मोजावे लागतील अधिक पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 8:05 PM

Flipkart News: ऑनलाईन कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून सामान मागवणे महागले आहे. जर तुम्ही फ्लिपकार्टवरून प्रॉडक्ट ऑर्डर केल्यानंतर कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडत असाल तर तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील.

नवी दिल्ली - ऑनलाईन कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून सामान मागवणे महागले आहे. जर तुम्ही फ्लिपकार्टवरून प्रॉडक्ट ऑर्डर केल्यानंतर कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडत असाल तर तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील.

फ्लिपकार्ट मोबाईल अॅप आणि वेबसाईटवर दाखवण्यात येत आहे की, कंपनी त्यासाठी ५ रुपयांचे माफक शुल्क आकारणार आहे. जर सामानाची किंमत असेल तर फ्लिपकार्ट प्लस मार्कवाल्या प्रॉडक्टसाठी ४० रुपयांची डिलिव्हरी फी आकारते. मात्र सामानाची किंमत ५०० रुपयांची किंमत कमी असेल तर फ्लिपकार्ट वेब पेजमधील माहितीनुसार ५०० रुपयांच्या वरील सामानासाठी कुठलाही शिपिंग चार्ज आकारला जात नाही. मात्र रियल कॉस्ट सेलरवर हे अवलंबून असते.  मिळालेल्या माहितीनुसार कंपनी सर्व कॅश ऑन डिलिव्हरीच्या प्रॉडक्टवर ५ रुपयांचा चार्ज लावते.

ही बाब चार्ज सामानाच्या व्हॅल्यूवर अवलंबून नसेल. फ्लिपकार्टच्या कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शनबाबत लिहिण्यात आले आहे. ऑनलाईन पे करून तुम्ही या शुल्कापासून वाचू शकता. मात्र फ्लिपकार्ट फ्लसच्या सब्स्क्रायबर्सजवळ डिलिव्हरी कॉस्ट न देता सामान खरेदी करू शकता.

मात्र आताही सर्व बायर्सना कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन सिलेक्ट केल्यास तुम्हाला ५ रुपये शुल्क द्यावे लागेल. हे सर्व युझर्ससाठी आवश्यक करण्यात आले आहे. कंपनी या पावलाच्या माध्यमातून युझर्सना ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी भाग पाडत आहेत. 

टॅग्स :फ्लिपकार्टव्यवसायपैसा