Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयटीचे ‘उडते पंछी’ येथे आता जमवताहेत घरटे, १५ महिन्यांत १५ हजार गेले कॅनडामध्ये 

आयटीचे ‘उडते पंछी’ येथे आता जमवताहेत घरटे, १५ महिन्यांत १५ हजार गेले कॅनडामध्ये 

‘द टेक्कॉलॉजी काउन्सिल्स ऑफ नॉर्थ अमेरिका अँड कॅनडा’ या संस्थेने जारी केलेल्या अभ्यासातून हे समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 05:08 AM2023-09-02T05:08:35+5:302023-09-02T05:10:02+5:30

‘द टेक्कॉलॉजी काउन्सिल्स ऑफ नॉर्थ अमेरिका अँड कॅनडा’ या संस्थेने जारी केलेल्या अभ्यासातून हे समोर आले आहे.

"Flying birds" of IT are now gathering nests here, 15 thousand have moved to Canada in 15 months | आयटीचे ‘उडते पंछी’ येथे आता जमवताहेत घरटे, १५ महिन्यांत १५ हजार गेले कॅनडामध्ये 

आयटीचे ‘उडते पंछी’ येथे आता जमवताहेत घरटे, १५ महिन्यांत १५ हजार गेले कॅनडामध्ये 

नवी दिल्ली : भारतातील तांत्रिक व्यावसायिकांसाठी (टेक प्रोफशनल) अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली नव्हे, तर कॅनडा हा सर्वाधिक पसंतीचा देश म्हणून समोर येत आहे. ‘द टेक्कॉलॉजी काउन्सिल्स ऑफ नॉर्थ अमेरिका अँड कॅनडा’ या संस्थेने जारी केलेल्या अभ्यासातून हे समोर आले आहे.

एप्रिल २०२२ आणि मार्च २०२३ या १५ महिन्यांच्या कालावधीत १५,०९७ तांत्रिक व्यावसायिक कॅनडामध्ये गेले, असे या अभ्यासात आढळून आले आहे. कॅनडातील विस्तारित तांत्रिक मनुष्यबळात भारतीयांचे योगदान सर्वाधिक आहे. या काळात ३२ हजार तांत्रिक व्यावसायिकांनी देशाबाहेर जाणे पसंत केले. 

हे आहे कारण
- कॅनडात तांत्रिक व्यावसायिकांच्या बाबतीत भारतानंतर नायजेरिया दुसऱ्या स्थानी आहे. 
- एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या काळात नायजेरियातील १,८०८ तांत्रिक व्यावसायिकांनी कॅनडात आश्रय घेतला. 
- स्थलांतरास पूरक धोरण आणि कामगार खर्च (लेबर कॉस्ट) ही या मागील मुख्य कारणे आहेत.

Web Title: "Flying birds" of IT are now gathering nests here, 15 thousand have moved to Canada in 15 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.