मुंबई : दैनंदिन गरजेच्या ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) क्षेत्रातील मंदीचा जोर वाढत असल्याने ग्रामीण आर्थिक वृद्धीला फटका बसत आहे. दुसऱ्या तिमाहीत या क्षेत्राचा वृद्धीदर मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांवर आला आहे. २०१९ च्या पहिला तिमाहीत या क्षेत्राचा वृद्धीदर १३.४ टक्के होता. शहरी भागात होत असलेला कमी खर्च व ग्रामीण भागात मंदावलेला खप यामुळे एफएमसीजी क्षेत्र उतरतीला आले आहे, असे निल्सन या बाजारपेठ संशोधन कंपनीने म्हटले आहे.
या क्षेत्रातील मंदी पाहता २०१९ या वर्षातील पहिल्या सहामाहीत या क्षेत्राचा वृद्धीदर १२ टक्के राहील, असा सुधारित अंदाज निल्सनने व्यक्त केला. याआधी वृद्धीदर १३ ते १४ टक्के असेल, असा अंदाज व्यक्त केला होता. महत्त्वाच्या कारक घटकांचे विश्लेषण केल्यानंतर २०१९ अखेर अखिल भारतातील एफएमसीजी क्षेत्राचा वृद्धीदर ९ ते १० टक्क्यांदरम्यान असेल, असा अंदाज निल्सनचे दक्षिण आशिया विभागाचे प्रमुख सुनील खिआनी यांनी व्यक्त केला. अन्नपदार्थ श्रेणीतील वस्तूंचा वृद्धीदर १० ते ११ टक्के, वैयक्तिक व घरगुती वस्तू श्रेणीचा वृद्धीदर अनुक्रमे ७ आणि ८ टक्के असेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
अर्थव्यवस्थेची एकूण स्थिती पाहता ढोबळ राष्टÑीय उत्पादनाचा वृद्धी (जीडीपी) दर ५.८ टक्के आहे. जीडीपी वृद्धीतील घसरणीने घरगुती वस्तूंवरील खर्चही कमी झाला आहे. पण जीडीपीत या क्षेत्राचा वाटा दोन तृतीयांश आहे. जीडीपी दरातील घसरणीचे पडसाद या क्षेत्रात उमटल्याचे कंपनीने म्हटले आहे.
एफएमसीजी क्षेत्रात मंदी; वृद्धीदर केवळ १० टक्क्यांवर
दैनंदिन गरजेच्या ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) क्षेत्रातील मंदीचा जोर वाढत असल्याने ग्रामीण आर्थिक वृद्धीला फटका बसत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 04:40 AM2019-07-19T04:40:41+5:302019-07-19T04:40:50+5:30