नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यात ऊर्जा, व्यापारासह परस्पर सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्यावर आपला भर राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. ते १६ आॅगस्ट रोजी संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर जाणार
आहेत.
भारत गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षक ठिकाण असल्याचेही तेथील गुंतवणूकदारांना पटवून देण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले. या दौऱ्याआधी त्यांनी सांगितले की, संयुक्त अरब अमिरात भारताचा महत्त्वपूर्ण भागीदार आहे. दोन्ही देशांदरम्यानचे संबंध याचा पुरावा आहे.
भारत संयुक्त अरब अमिरातचा सर्वांत दुसऱ्या क्रमाकांचा मोठा व्यापारी सहकारी आहे.
तेथील भारतीय समुदायशी संवाद साधण्यास मी उत्सुक आहे. त्यांनी अनेक वर्षे तेथे राहून कठोर मेहनत घेतली, त्यासाठी ते प्रशंसेचे हक्कदार आहेत. संयुक्त अरब अमिरातला स्वत:चे घर मानणाऱ्या २५ लाखांहून अधिक भारतीयांच्या योगदानाचाही त्यांनी निवदेनात उल्लेख केला आहे.
३५ वर्षांनंतर संयुक्त अरब अमिरातला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांदरम्यानचे संबंध आणखी बळकट होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ऊर्जा, व्यापारासह सहकार्यावर भर
संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यात ऊर्जा, व्यापारासह परस्पर सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्यावर आपला भर राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी
By admin | Published: August 13, 2015 10:02 PM2015-08-13T22:02:33+5:302015-08-13T22:02:33+5:30