Lokmat Money > बिझनेस न्यूज > वीजसंकट दूर करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर भर द्या

वीजसंकट दूर करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर भर द्या

पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वाढता आयात खर्च बघता, येत्या काळात अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापराची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

By admin | Published: February 16, 2015 12:30 AM2015-02-16T00:30:28+5:302015-02-16T00:30:28+5:30

पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वाढता आयात खर्च बघता, येत्या काळात अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापराची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

Focus on non-conventional energy sources to remove electricity congestion | वीजसंकट दूर करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर भर द्या

वीजसंकट दूर करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर भर द्या

नवी दिल्ली : पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वाढता आयात खर्च बघता, येत्या काळात अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापराची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले़ स्वस्त विजेसाठी सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात नवसंशोधनाची गरज असल्याचे ते म्हणाले़
येथे आयोजित पहिल्या अपारंपरिक ऊर्जा जागतिक गुंतवणूक परिषदेच्या (रि-इन्व्हेस्ट) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जास्रोत असणाऱ्या ५० देशांचा एक गट स्थापन करण्याच्या दिशेने भारत प्रयत्नशील आहे़ अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात नवे संशोधन आणि तंत्रज्ञानाला चालना देणे आणि गरीब आणि दुर्गम भागात वीज पोहोचविणे हा यामागचा भारताचा उद्देश असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले़
देशात अद्ययावही औष्णिक, जल आणि अणु ऊर्जेवर भर दिला जात आहे; पण यापुढे सौर, पवन आणि जैवइंधन अशा ऊर्जा पर्यायांवर आपला भर असला पाहिजे़ मागास आणि दुर्गम भागात वीज पोहोचविण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा पर्यायांवर अधिकाधिक भर देणे गरजेचे असल्याचे मोदी यावेळी म्हणाले़ देशाच्या शेवटच्या कुटुंबापर्यंत वीज पोहोचत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकासाच्या फळाची चव आम आदमीला चाखता येणार नाही़ ऊर्जा उत्पादने आणि दळणवळण क्षेत्रातील विकासाशिवाय आपल्याकडे अन्य कुठलाही पर्याय नसल्याचेही ते म्हणाले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Focus on non-conventional energy sources to remove electricity congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.