Join us

इन्फोसिसबाबतच्या आक्षेपांवर ठाम

By admin | Published: February 14, 2017 11:53 PM

इन्फोसिसच्या संचालक मंडळाच्या कार्यप्रणालीबाबत जी काळजी व्यक्त केली होती, ती कायम असून यात आपण कोणतीही माघार घेतली नसल्याचे

बंगळुरू : इन्फोसिसच्या संचालक मंडळाच्या कार्यप्रणालीबाबत जी काळजी व्यक्त केली होती, ती कायम असून यात आपण कोणतीही माघार घेतली नसल्याचे इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी म्हटले आहे. कंपनीच्या प्रशासकीय पारदर्शकतेबाबत नारायणमूर्ती यांनी काही दिवसांपूर्वीच काळजी व्यक्त केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांचे वेतन वाढवून १.१ कोटी डॉलर केल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नारायणमूर्ती म्हणाले की, ‘इन्फोसिसच्या संचालक मंडळाला या आक्षेपांचे उत्तर द्यावे लागेल. यात पूर्ण पारदर्शकता दाखवावी लागेल आणि जबाबदार लोकांनी जबाबदारी घ्यायला हवी.’ कंपनीबाबत नारायणमूर्ती यांनी जी काळजी व्यक्त केली आहे, त्या मुद्द्यावर त्यांनी आपली पावले मागे घेतली असल्याचे वृत्त आले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘मी माझ्या मतावर ठाम आहे.’ एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, ‘इन्फोसिसच्या संचालक मंडळात सर्व लोक चांगली नियत ठेवणारे, प्रामाणिक आहेत, पण चांगल्या लोकांकडूनही कधी-कधी चुका होतात. चांगल्या नेतृत्वाचे हे काम आहे की, सर्व बाजूंनी व्यक्त झालेल्या आक्षेपांवर वा काळजीवर लक्ष द्यायला हवे.’‘त्या निर्णयाचे पुनर्मूल्यांकन करायला हवे. मला अपेक्षा आहे की, सर्व काही लवकर ठीक होईल. कंपनीच्या हितासाठी येथील व्यवस्था अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करण्यात येईल,’ असेही ते पुढे म्हणाले.