नवी दिल्ली : खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त झाल्यामुळे जून महिन्यात घाऊक महागाईचा दर घटून-४.१२ टक्क्यांवर आला आहे. गेल्या आठ वर्षांतील हा नीचांकी दर आहे. सलग तिसऱ्या महिन्यात घाऊक महागाईच्या दरात घट नाेंदविण्यात आली आहे.
जून महिन्यात प्रामुख्याने मिनरल ऑइल्स, खाण्यापिण्याच्या वस्तू, धातू, कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि वस्त्रांच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक महागाईचा दर घटला. याशिवाय इंधन आणि विजेच्या दरात १२.६३ टक्के घट नाेंदविण्यात आली. उत्पादन क्षेत्रातील महागाई घटून २.७१ टक्क्यांवर आली आहे.
सर्वसामान्यांवर परिणाम
घाऊक महागाईचा दर दीर्घकाळ जास्त असल्यास उत्पादन क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम हाेताे. उत्पादक याचा बाेजा थेट ग्राहकांवर टाकतात. त्यामुळे लाेकांना अर्थातच जास्त पैसे माेजावे लागतात.
नकारात्मक महागाई घातक
मागणीपेक्षा पुरवठा जास्त असेल तर नकारात्मक महागाई हाेते. वस्तूंचे दर काेसळतात. कंपन्यांचा नफा घटताे आणि कर्मचारी कपात हाेते.
अशी घटली घाऊक महागाई
महिना दर (%)
जून २०२२ १५.१८
जुलै २०२२ १३.९३
ऑगस्ट २०२२ १२.४१
सप्टेंबर २०२२ १०.७०
ऑक्टाेबर २०२२ ८.३९
नाेव्हेंबर २०२२ ५.८५
डिसेंबर २०२२ ४.९५
जानेवारी २०२३ ४.७३
फेब्रुवारी २०२३ ३.८५
मार्च २०२३ १.३४
एप्रिल २०२३ -०.९२
मे २०२३ -३.४८
जून २०२३ -४.१२