Join us

अन्नधान्याचे भाव आटोक्यात राखणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 7:43 AM

गहू आणि तांदळाच्या व्यापारावर चीनकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे या आर्थिक वर्षात भारताच्या निर्यातीत ४३,००० कोटींची घट होऊ शकते. 

नवी दिल्ली : घरगुती बाजारातील किमती नियंत्रणात राहाव्या आणि ग्राहकांसाठी कमी पडू नये यासाठी केंद्र सरकारने ठोक इ-लिलावाद्वारे ३.४६ लाख टन गहू आणि १३,१६४ टन तांदळाची विक्री ग्राहकांना केली. २० नोव्हेंबर लिलाव पार पडले. दर नियंत्रणासाठी साप्ताहिक इ-लिलाव भारतीय अन्न महामंडळाकडून लीलाव केला जातो. 

गव्हाची विक्री २,१७८ रुपये प्रति क्विंटल रुपये दराने तर तांदळाची विक्री २,९०५ प्रति क्विंटल दराने केली. मागच्या इ-लिलावात ३,३०० टन तांदळाची विक्री करण्यात आली होती. य महिन्याच्या सुरुवातीला अन्न विभागाचे सचिव संजीव चोपडा यांनी स्पष्ट केले होते की, जानेवारी-मार्च दरम्यान सरकारने २५ लाख टन इतक्या गव्हाची खुल्या बाजारात विक्रीची तयारी ठेवली आहे.

चिनी निर्बंधांमुळे निर्यात ४३,००० कोटींनी घटणारगहू आणि तांदळाच्या व्यापारावर चीनकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे या आर्थिक वर्षात भारताच्या निर्यातीत ४३,००० कोटींची घट होऊ शकते. त्यात घरगुती बाजारातील दर नियंत्रणात राहण्यासाठी भारताने गहू आणि तांदळाच्या निर्यातीवर आधीच बंदी घातली आहे. व्यापार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, येमेनच्या हुती समुदायाने लाल समुद्रावर हल्ले केल्यास जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो. इतर कृषी उत्पादनांच्या जगभरातील देशांना होणाऱ्या निर्यातीतून भारताला झालेला नुकसान भरून काढणे शक्य होणार आहे.यामुळे निर्यातीसाठी पर्याय म्हणून आफ्रिकेमार्गे व्यापाराचा विचार करता येईल परंतु यामुळे किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढू शकतात.

टॅग्स :महागाई