लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बुधवारी ८० पैशांनी वाढ करण्यात आली. सलग नवव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. बुधवारच्या वाढीबरोबरच डिझेलने देशात अनेक ठिकाणी शंभरी पार केली.
आता नव्या दरानुसार मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत ११६.७२ रुपये झाली, तर डिझेल १००.९४ रुपये प्रतिलिटर झाले. गेल्या नऊ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत एकूण पाच रुपये ६० पैशांची वाढ झाली आहे.