Lokmat Money > बिझनेस न्यूज > Forcas Studio IPO : ९०% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO; शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट

Forcas Studio IPO : ९०% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO; शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट

Forcas Studio IPO : कंपनीनं शेअर बाजारात शानदार लिस्टिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. एनएसई एसएमईवर कंपनीची लिस्टिंग आज ९० टक्के प्रीमियमसह १५२ रुपयांवर झालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:36 AM2024-08-26T11:36:01+5:302024-08-26T11:36:20+5:30

Forcas Studio IPO : कंपनीनं शेअर बाजारात शानदार लिस्टिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. एनएसई एसएमईवर कंपनीची लिस्टिंग आज ९० टक्के प्रीमियमसह १५२ रुपयांवर झालं.

Forcas Studio IPO listed at 90 percent premium Investors jumped on the stock upper circuit to share | Forcas Studio IPO : ९०% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO; शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट

Forcas Studio IPO : ९०% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO; शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट

Forcas Studio IPO : फोर्कस स्टुडिओच्या शेअरनं शेअर बाजारात शानदार लिस्टिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. एनएसई एसएमईवर कंपनीची लिस्टिंग आज ९० टक्के प्रीमियमसह १५२ रुपयांवर झालं. आयपीओसाठी प्रति शेअर ७७ ते ८० रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. जबरदस्त लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सलाही अपर सर्किट लागलंय.

गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

फोर्कस स्टुडिओचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी १९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान खुला होता. कंपनीच्या आयपीओची साईज ३७.४४ कोटी रुपये होता. कंपनीचा शेअर १५२ रुपयांवर लिस्ट झाल्यानंतर १५९.६० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअर्सनं अपर सर्किटला धडक दिली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केली असेल आणि ज्यांना शेअर्सचं वाटप झालं असेल, त्यांचे पैसे दुप्पट झाले.

कंपनीचा आयपीओ पूर्णपणे फ्रेश इश्यूवर आधारित असेल. या इश्यूच्या माध्यमातून कंपनी ४६.८० लाख शेअर्स जारी केले. आयपीओसाठी कंपनीनं तब्बल १६०० शेअर्सचा एक लॉट तयार केला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १ लाख २८ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागली.

३ दिवसांत ५०० पटीहून अधिक सब्सक्रिप्शन

तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी फोर्कस स्टुडिओचा आयपीओ ४१६ पट सब्सक्राइब झाला. पहिल्या दिवशी ३६ पट तर दुसऱ्या दिवशी १०४ पट सब्सक्रिप्शन मिळालं. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून १०.६५ कोटी रुपये उभे केले आहेत. अँकर गुंतवणूकदारांना देण्यात येणाऱ्या ५० टक्के शेअर्सचा लॉक-इन पीरिअड २१ सप्टेंबरपर्यंत आहे.

आयपीओपूर्वी प्रवर्तक शैलेश अग्रवाल आणि सौरव अग्रवाल यांचा मिळून ८२.१७ टक्के हिस्सा होती. जो आयपीओनंतर ६०.३० टक्क्यांवर आलाय.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Forcas Studio IPO listed at 90 percent premium Investors jumped on the stock upper circuit to share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.