कोकणीची सक्ती मागे : सीडीसाठी
By admin | Published: July 03, 2015 10:55 PM
उच्च पदांसाठी कोकणीची सक्ती नकोमंत्रिमंडळाचा निर्णयपणजी : व्यावसायिक महाविद्यालयांतील विविध पदे, आरोग्य सेवा क्षेत्रातील सल्लागार पदे आणि उच्च अशा तांत्रिक व शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या पदांसाठी कोकणी भाषेच्या ज्ञानाची सक्ती करायची नाही. त्यासाठी उमेदवार मिळत नाहीत तेव्हा कोकणीची अट शिथिल करावी, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या सर्व पदांसाठी उमेदवार भरती ही गोवा लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. अनेकवेळा या पदांसाठी गोमंतकीय उमेदवार सापडत नाहीत. त्यामुळे पदे रिक्त उरतात. कोकणी भाषेच्या ज्ञानाची सक्ती असल्याने परप्रांतांमधील व्यक्तींनाही या पदांसाठी नोकरीवर घेता येत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी चर्चा झाली व कोकणीचे ज्ञान असलेला उमेदवार जेव्हा उपरोल्लेखित पदांसाठी मिळत नाही तेव्हा कोकणी सक्तीची अट शिथिल करावी, अशी सूचना आयोगास करावी असे ठरले. त्यासाठी सरकारने यापूर्वीच्या काही अधिसूचनांचाही आधार घेतला आहे.