मुंबई : प्रीमियम श्रेणीतील गाड्यांची विक्री करणाऱ्या फोर्ड इंडियाने ‘मिडनाइट सरप्राइज’ सेलची घोषणा केली आहे. हा सेल शुक्रवार, ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्याअंतर्गत ११ कोटी रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. सेलद्वारे फोर्डची गाडी खरेदी करणाºयांना बम्पर ड्रॉसह अनेक बक्षिसे मिळणार आहेत. ७ ते ९ डिसेंबरदरम्यान होणाºया या सेलसाठी शोरूम सकाळी ९ ते मध्यरात्रीपर्यंत सुरू असतील. यामुळेच सेलला ‘मिडनाइट सरप्राइज’ हे नाव दिले आहे. यात फोर्डची गाडी बूक करणाºया प्रत्येकास इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, सोन्याचे नाणे, आय फोन एक्स, एलईडी टीव्ही अशा भेटवस्तू मिळणार आहेत, तसेच ग्राहकांना पॅरिसच्या टूरची भेटही मिळू शकणार आहे. या कालावधित फोर्डची गाडी बूक करणाºयांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येईल. ड्रॉमधील विजेत्या ग्राहकाला फोर्ड फिगो हे बम्पर बक्षीस मिळेल. फोर्ड इंडियाचे कार्यकारी संचालक (विक्री व मार्केटिंग) विनय रैना म्हणाले की, फोर्डची गाडी खरेदी करणाºया ग्राहकांसाठी हा सेल ही एक आनंदाची पर्वणी ठरणार आहे. याद्वारे नवीन ग्राहकांचे फोर्ड कुटुंबात जल्लोषात स्वागत करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. हा सेल फोर्ड फिगो, नवीन फोर्ड अॅस्पायर, फोर्ड फ्रीस्टाइल, फोर्ड इकोस्पोर्ट व फोर्ड एन्डेव्हर या गाड्यांच्या सर्व श्रेणींवर लागू असेल.
‘फोर्ड’चा ‘मिडनाइट सरप्राइज’ सेल उद्यापासून
प्रीमियम श्रेणीतील गाड्यांची विक्री करणाऱ्या फोर्ड इंडियाने ‘मिडनाइट सरप्राइज’ सेलची घोषणा केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 04:07 AM2018-12-06T04:07:09+5:302018-12-06T04:11:16+5:30