नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विक्री प्रक्रियेत विदेशी कंपन्यांनाही सहभागी होऊन बोली लावता यावी यासाठी सरकारकडून नियमांत बदल केला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
आजच्या धोरणानुसार विदेशी कंपन्यांनाही एअर इंडियाच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी दिली जाईल, याला आम्ही दुजोरा देऊ शकतो, असे या प्रक्रियेशी संबंधित सूत्रांनी सांगितले. सध्याच्या नियमानुसार विदेशी विमान वाहतूक कंपन्या भारतीय विमान वाहतूक कंपन्यांत ४९ टक्के हिस्सेदारी ठेवू शकतात. तथापि, या नियमाला एअर इंडियाचा अपवाद आहे. हे धोरण एअर इंडियालाही लागू व्हावे यासाठी नियमात बदल केला जाणार आहे. एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा उद्योगसमूह आणि इंटरग्लोबल एव्हिएशन या कंपन्यांनी रस दाखविला आहे. विदेशी कंपन्यांना एअर इंडियाची खरेदी करता यावी, यासाठी सरकारला अनेक नियमांत बदल करावा लागणार आहे. एअर इंडियाला विदेशी गुंतवणुकीपासून दूर ठेवण्यासाठी औद्योगिक धोरण व प्रोत्साहन मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस नोट क्रमांक ६ मध्ये (२0१२ मालिका) प्रथम बदल करावा लागेल.
एअर इंडिया घेणार १,१00 कोटींचे कर्ज
दरम्यान, व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या वाहतुकीसाठी एअर इंडियाकडून पुढील महिन्यात दोन बोइंग विमाने घेतली जाणार आहेत. या विमानांत गरजेनुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी एअर इंडिया १,१00 कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे.
बोइंग ७७७-३00 ईआर या जातीची ही विमाने जानेवारी २0१८ मध्ये एअर इंडियाला मिळणार आहे. त्यांची किंमत सुमारे १८0 दशलक्ष डॉलर आहे. सध्याच्या विनिमय दरानुसार ही रक्कम १,१६0 कोटी रुपये होते.
ही विमाने राष्टÑपती, उपराष्टÑपती आणि पंतप्रधान यांच्यासाठी वापरण्यात येणार आहे. एअर इंडियावर आधीच ५0 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.
एअर इंडियासाठी विदेशी कंपन्या लावणार बोली, नियमांत करणार बदल, देशातील अनेक कंपन्याही खरेदीस इच्छुक
एअर इंडियाच्या विक्री प्रक्रियेत विदेशी कंपन्यांनाही सहभागी होऊन बोली लावता यावी यासाठी सरकारकडून नियमांत बदल केला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:57 AM2017-12-12T00:57:27+5:302017-12-12T00:57:55+5:30