नवी दिल्ली : खासगीकरणाच्या प्रक्रियेत असलेल्या एअर इंडियातील ४९ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यात रस दाखविणारी ती रहस्यमय विदेशी कंपनी हवाई वाहतूक क्षेत्रातील फारसी परिचित कंपनी नाही, असे सांगण्यात येत आहे. एका विदेशी कंपनीने एअर इंडियाच्या खरेदीत रस दाखविला असल्याचे सरकारने जानेवारीत जाहीर केले होते. मात्र तिचे नाव गुलदस्त्यातच ठेवले होते. ही कंपनी कोणती, याचा खुलासा अजूनही झालेला नाही.एका अधिकाºयाने सांगितले की, आमच्या संपर्कात आलेली विदेशी कंपनी कोणी ख्यातनाम हवाई वाहतूक कंपनी नाही. एखाद्या ख्यातनाम हवाई वाहतूक संस्थेमागे ही कंपनी आहे का, याचीही माहिती नाही. आपले नाव जाहीर करण्याची या कंपनीची इच्छा आहे का, याबाबतही काहीच सांगता येत नाही. या रहस्यमय विदेशी कंपनीव्यतिरिक्त इंडिगोने एअर इंडियाच्या खरेदीसाठी प्रस्ताव दिला आहे. टाटा समूह व सिंगापूर एअर लाइन्सच्या भागीदारीतील जेव्ही विस्तारा कंपनीने रस दाखविला आहे. तथापि, अद्याप रीतसर प्रस्ताव दिलेला नाही. आपले मन याबाबत खुले आहे, असे कंपनीने म्हटले आहे. अन्य एक कंपनी जेट सध्या बघ्याच्या भूमिकेत आहे. नेमका प्रस्ताव काय आहे, कितीचा आहे याची कंपनी वाट पाहत आहे.कतार एअरवेज येणार भारतातकतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बाकेर यांनी भारतात विमान कंपनी सुरू करण्याचा मनोदय याआधीच जाहीर केलेला आहे. त्याची औपचारिक प्रक्रिया अजून कंपनीने सुरू केलेली नाही. हवाई वाहतूक खात्याच्या अधिकाºयाने सांगितले की, भारतात हवाई वाहतूक कंपनी सुरू करण्यासाठी कतार एअरवेजने अजून औपचारिक अर्ज केलेला नाही. अल बाकेर यांनी फ्रान्समध्ये पत्रकारांना सांगितले की, आम्ही भारतात एक हवाई कंपनी सुरू करणार आहोत. आमच्याकडे किमान १00 विमानांचा ताफा असेल.
एअर इंडियात रस दाखविणारी ती विदेशी कंपनी अपरिचितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 3:35 AM