Lokmat Money > बिझनेस न्यूज > विदेशी गुंतवणूक मर्यादावाढीचा सोमवारी करणार लिलाव

विदेशी गुंतवणूक मर्यादावाढीचा सोमवारी करणार लिलाव

सरकारचे सुमारे २,८०० रुपये किमतीचे रोखे खरेदी करण्यासाठी विदेशी संस्थांची खरेदी मर्यादा वाढविण्याचा निर्णय राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) घेतला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:00 AM2017-09-23T01:00:19+5:302017-09-23T01:00:22+5:30

सरकारचे सुमारे २,८०० रुपये किमतीचे रोखे खरेदी करण्यासाठी विदेशी संस्थांची खरेदी मर्यादा वाढविण्याचा निर्णय राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) घेतला.

Foreign direct investment auction will be held on Monday | विदेशी गुंतवणूक मर्यादावाढीचा सोमवारी करणार लिलाव

विदेशी गुंतवणूक मर्यादावाढीचा सोमवारी करणार लिलाव

नवी दिल्ली : सरकारचे सुमारे २,८०० रुपये किमतीचे रोखे खरेदी करण्यासाठी विदेशी संस्थांची खरेदी मर्यादा वाढविण्याचा निर्णय राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) घेतला.
विदेशी संस्थांना ही वाढीव खरेदी मर्यादा विकत घ्यावी लागेल. त्यासाठी एनएसईकडून येत्या सोमवारी लिलाव केला जाणार आहे.
एनएसईने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एनएसईच्या ई-निविदा प्लॅटफॉर्मवरून वाढीव खरेदी मर्यादेचा हा लिलाव केला जाईल. शेअर बाजाराचे दैनंदिन कामकाज बंद झाल्यानंतर दुपारी ३.३० वाजता लिलाव सुरू होईल. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तो चालेल. लिलाव कोट्यातून गुंतवणूकदारांना ठरावीक मर्यादेपर्यंत कर्ज गुंतवणूक हक्क मिळतील.

Web Title: Foreign direct investment auction will be held on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.