नवी दिल्ली : सरकारचे सुमारे २,८०० रुपये किमतीचे रोखे खरेदी करण्यासाठी विदेशी संस्थांची खरेदी मर्यादा वाढविण्याचा निर्णय राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) घेतला.विदेशी संस्थांना ही वाढीव खरेदी मर्यादा विकत घ्यावी लागेल. त्यासाठी एनएसईकडून येत्या सोमवारी लिलाव केला जाणार आहे.एनएसईने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एनएसईच्या ई-निविदा प्लॅटफॉर्मवरून वाढीव खरेदी मर्यादेचा हा लिलाव केला जाईल. शेअर बाजाराचे दैनंदिन कामकाज बंद झाल्यानंतर दुपारी ३.३० वाजता लिलाव सुरू होईल. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तो चालेल. लिलाव कोट्यातून गुंतवणूकदारांना ठरावीक मर्यादेपर्यंत कर्ज गुंतवणूक हक्क मिळतील.
विदेशी गुंतवणूक मर्यादावाढीचा सोमवारी करणार लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:00 AM