मुंबई : देशाची परकीय गंगाजळी विक्रमी ३३० अब्ज डॉलर झाली असली तरी त्यावरच समाधान मानता येत नाही. कारण आत्यंतिक चढ-उताराच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कितीही परकीय गंगाजळी अपुरीच पडते, असे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच.आर. खान यांनी सांगितले.
खान म्हणाले की, परकीय गंगाजळीची परिस्थिती सुधारली असून सध्या ती विक्रमी अशा ३३० अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे; परंतु अनपेक्षितपणे निर्माण होणाऱ्या चढ-उताराच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कितीही परकीय गंगाजळी हवीच असते. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार परकीय गंगाजळीमध्ये गेल्या आठवड्यात सहा अब्ज डॉलरची भर पडली व एकूण गंगाजळी विक्रमी पातळीवर पोहोचली. उच्च वृद्धी, चालू खात्यावरील संतुलित तोटा, चलनवाढीचा घटलेला दर आणि परकीय गंगाजळीची चांगली स्थिती पाहता नाजूक आर्थिक परिस्थिती बरीचशी घटली आहे, असे खान म्हणाले. विकसनशील देशांत भारताची आर्थिक स्थिती चांगली आहे व अशी परिस्थिती अनेक वर्षांनी निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या कर्ज धोरणात होणाऱ्या बदलांना तोंड देण्यासाठी रिझर्व्ह बँक डॉलर एकत्र करून त्यावर लक्ष्य केंद्रित करीत असल्याचे समजले जाते. कारण फेडरल रिझर्व्हच्या कर्ज धोरणांमुळे भारतासारख्या विकसनशील देशांतून गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात होते.
मे २०१३ मध्ये परकीय गंगाजळी कमी होऊन २८० अब्ज डॉलरवर आली होती. (वृत्तसंस्था)
विदेशी चलनसाठा ३३० अब्ज डॉलरवर
देशाची परकीय गंगाजळी विक्रमी ३३० अब्ज डॉलर झाली असली तरी त्यावरच समाधान मानता येत नाही. कारण आत्यंतिक चढ-उताराच्या परिस्थितीला
By admin | Published: February 10, 2015 11:07 PM2015-02-10T23:07:55+5:302015-02-10T23:07:55+5:30