Join us

परकीय वित्तसंस्थांनी गुंतविले २ अब्ज डॉलर

By admin | Published: May 22, 2017 12:44 AM

मे महिन्यात आतापर्यंत परकीय वित्तसंस्थांनी भारतीय भांडवल बाजारामध्ये दोन अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे. यापैकी बहुसंख्य गुंतवणूक ही डेट फंडामध्ये झाली आहे, हे विशेष.

मे महिन्यात आतापर्यंत परकीय वित्तसंस्थांनी भारतीय भांडवल बाजारामध्ये दोन अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे. यापैकी बहुसंख्य गुंतवणूक ही डेट फंडामध्ये झाली आहे, हे विशेष.परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ४,१५७ कोटी रुपये हे विविध आस्थापनांच्या समभागांमध्ये गुंतविले असून, १२हजार ९८४ कोटी रुपये हे डेट मार्केटमध्ये गुंतविलेले दिसून येतात. याचाच अर्थ, या संस्थांचा भारतामधील समभागांकडील ओढा कमी झालेला दिसून येत आहे.मध्यंतरी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या प्रचंड बहुमताने आर्थिक सुधारणांचा वेग वाढण्याची निर्माण झालेली शक्यता, रुपयाचे स्थिरावत असलेले मूल्य आणि अमेरिकेतील डेट फंडांपेक्षा भारतीय बाजारामधून मिळणारा चांगला परतावा, या कारणांमुळे ही गुंतवणूक वाढत असल्याचे दिसून येत आहे.