Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा समूहावर परदेशी व्यक्ती?

टाटा समूहावर परदेशी व्यक्ती?

टाटा समूहातून सायरस मिस्त्री यांना हटविल्यानंतर आता त्यांचे उत्तराधिकारी कोण? यावर सध्या चर्चा सुरू आहे.

By admin | Published: November 7, 2016 12:28 AM2016-11-07T00:28:45+5:302016-11-07T00:36:03+5:30

टाटा समूहातून सायरस मिस्त्री यांना हटविल्यानंतर आता त्यांचे उत्तराधिकारी कोण? यावर सध्या चर्चा सुरू आहे.

Foreign group on Tata group? | टाटा समूहावर परदेशी व्यक्ती?

टाटा समूहावर परदेशी व्यक्ती?

मुंबई : टाटा समूहातून सायरस मिस्त्री यांना हटविल्यानंतर आता त्यांचे उत्तराधिकारी कोण? यावर सध्या चर्चा सुरू आहे. या पदासाठी रतन टाटांकडून जुनी पद्धत पुन्हा वापरली जाऊ शक ते, असे सांगितले जात आहे. सायरस मिस्त्री हे टाटा समूहासाठी तसेही तडजोडीचेच उमेदवार होते. आता देशातील किंवा विदेशातील व्यक्तीचीही या समूहाच्या प्रमुखपदी निवड केली जाऊ शकते. 
याअगोदरच्या पिढीत जेआरडी टाटा यांनी सीईओपदी तरुण उमेदवारांना संधी दिल्याची उदाहरणे आहेत. यापैकी काही अधिकारी नंतर याच क्षेत्रात यशस्वी झाले. अजित केरकर हे यापैकीच एक नाव. केटरिंग मॅनेजर म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या केरकर यांना टाटा समूहात आॅफिस असिस्टंट म्हणून संधी मिळाली होती. त्यानंतर काही वर्षांत ते टाटा स्टीलचे अध्यक्ष झाले. बाहेरच्या देशातूनही टाटा समूहाने मोठे अधिकारी आणले. यातीलच एक हायप्रोफाईल नाव म्हणजे आर. गोपालकृष्णन. ते कंपनीच्या अध्यक्षपदावर नव्हते; पण टाटा समूहातील बोर्डाच्या अध्यक्षपदावर मात्र त्यांची वर्णी होती.


आतापर्यंतचे विदेशी अधिकारी
टाटा टेलिसर्व्हिसमध्ये २००५मध्ये रुजू झालेले विदेशी अधिकारी म्हणजे डॅरिल ग्रीन. जपानमधील वोडाफोन सोडून 
ते थेट टाटा समूहात आले. मात्र,2007मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली. एलन रोसलिंग हे २००७मध्ये टाटा समूहात दाखल झाले. 
2009 पर्यंत ते समूहात होते. जग्वार लँड रोव्हरच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा समजला जातो. सध्या टाटा मोटर्सचे सीईओ हे जर्मनीचे गंटेर बटशेक हे आहेत, तर अमेरिकन नागरिकत्व असलेले राकेश सरन हे इंडियन हॉटेल्सचे काम पाहतात. गंटेर बटशेक यांच्या पूर्वी या जागेवर ब्रिटिश अधिकारी कार्ल स्लॅम हे होते. रतन टाटा यांच्या निवृत्तीपूर्वी त्यांची नियुक्ती झाली होती. आयसीआयसीआयमधून किशोर चौकर हे टाटा समूहात आलेले आहेत. टाटा इंडस्ट्रीजचे ते प्रमुख आहेत. रवी कांत हे १९९९मध्ये फिलिप्समधून टाटा समूहात आले होते. एकूणच काय तर टाटा समूहात देशविदेशातील मोठ्या कंपन्यांतून आलेल्या अधिकाऱ्यांची यादी बघता आता पुन्हा तसेच होऊ शकते.

Web Title: Foreign group on Tata group?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.