Join us

जानेवारीत विदेशी गुंतवणूक १,२८८ कोटींची

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 4:45 AM

गुंतवणूकदारांनी (एफपीआय) जानेवारी महिन्यात भारतीय भांडवली बाजारात अमेरिका आणि चीन व्यापारासंदर्भातील सकारात्मक घडामोडींमुळे खरेदीवर भर देत १,२८८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

नवी दिल्ली : अमेरिका-इराणदरम्यानचा वाढता तणाव आणि देशांतर्गत आर्थिक आव्हाने असताना विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफपीआय) जानेवारी महिन्यात भारतीय भांडवली बाजारात अमेरिका आणि चीन व्यापारासंदर्भातील सकारात्मक घडामोडींमुळे खरेदीवर भर देत १,२८८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (एनएसडीएल) आकडेवारीनुसार एफपीआयने १ ते १७ जानेवारीदरम्यान शेअर्समध्ये १०,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली, तर कर्ज बाजारातून ८,९१२ कोटी रुपये काढून घेतले. त्यानुसार या अवधीत विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी निव्वळ १,२८८ कोटी रुपयांची भारतीय भांडवली बाजारात गुंतवणूक केली.भारतीय भांडवली बाजारातील बव्हंशी गुंतवणूक अमेरिका-चीनदरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील व्यापार करारानंतर झाली. नजीकच्या काळात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार गुंतवणूक वाढवितील असा अंदाज आहे, असे ग्रो चे सह-संस्थापक आणि मुख्य संचालन अधिकारी हर्ष जैन यांनी म्हटले आहे.२०१९ मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी जोम दाखविल्यानंतर २०२० ची सुरुवात मात्र गुंतवणुकीच्या आघाडीवर सामसूम होती. त्यामागचे कारण अमेरिका आणि इराणदरम्यानचा वाढता तणाव होय. त्याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या धारणेवर झाला. त्यामुळे त्यांनी भारतासारख्या बाजारातून पैसा काढण्याचा मार्ग पत्करला, असे रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले. अमेरिका-इराणदरम्यानचा तणाव निवळण्याचे संकेत आहेत.गुंतवणुकीचा कल सुधारण्याकामी भूमिकादुसरीकडे अमेरिका-चीन व्यापार करारासंदर्भातील सकारात्मक घडामोडी पाहता विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा उत्साह वाढेल. शिवाय आगामी केंद्रीय अर्थसंकल्प त्यांचा गुंतवणुकीचा कल सुधारण्याकामी महत्त्वाची भूमिका बजावील.परिणामी नजीकच्या काळात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा गुंतवणूक करण्याचा कल वाढू शकतो, असेही ते म्हणाले.

टॅग्स :भारतअर्थव्यवस्था