Join us  

विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढली

By admin | Published: July 29, 2016 5:00 AM

विदेशी बँका, विमा कंपन्या, शेअर बाजार आणि वस्तू बाजार (कमॉडिटी एक्सचेंज) यांना भारतीय शेअर बाजारांतील गुंतवणुकीची मर्यादा ५ टक्क्यांनी वाढवून १५ टक्के करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : विदेशी बँका, विमा कंपन्या, शेअर बाजार आणि वस्तू बाजार (कमॉडिटी एक्सचेंज) यांना भारतीय शेअर बाजारांतील गुंतवणुकीची मर्यादा ५ टक्क्यांनी वाढवून १५ टक्के करण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला. विदेशी गुंतवणूकदारांना प्रारंभिक प्रस्तावात (आयपीओ) तसेच दुय्यम बाजारांतही समभाग खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयांनी भारतीय बाजारांची जगाच्या अन्य बाजारांसोबतची स्पर्धा क्षमता वाढणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवरील प्रचलन याचा अंगीकार करण्यासही बाजारास मदत होणार आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून भारताच्या देशांतर्गत भांडवली बाजाराची एकूण वृद्धी आणि विकास होईल, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २0१६-१७ या वर्षाच्या अर्थसंकल्पातच या निर्णयाची घोषणा केली होती. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.