नवी दिल्ली : विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) नोव्हेंबरमध्ये भारतीय भांडवली बाजारपेठेत १२,२६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक दहा महिन्यांच्या उच्चांकावर आहे. कच्च्या तेलाच्या दरात घसरण व रुपयात सुधारणा झाल्याने गुंतवणूक वाढली.
या आधी सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून जवळपास ६० हजार कोटी रुपये काढून घेतले होते. त्या आधी जुलै-आॅगस्टमध्ये ७,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आता नोव्हेंबरमध्ये एफपीआयने शेअर बाजारात ६,९१३ कोटी रुपये व कर्ज बाजारात ५,४३७ कोटी रुपये गुंतविले होते. त्यामुळे भांडवली बाजारात त्यांची एकूण गुंतवणूक १२,२६० कोटी रुपयांची झाली. जानेवारीमध्ये एफपीआयने २२,२४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. जानेवारी, मार्च, जुलै व आॅगस्ट या महिन्यांत गुंतवणूकदारांनी बाजारात ३२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. एफपीआयने सप्टेंबर २०१८ मध्ये भांडवली बाजारातून (शेअर व कर्ज) २१ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढून घेतली. आॅक्टोबरमध्येही रक्कम काढणे सुरूच होते.
विदेशी गुंतवणूक दहा महिन्यांच्या उच्चांकावर
विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) नोव्हेंबरमध्ये भारतीय भांडवली बाजारपेठेत १२,२६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:46 AM2018-12-03T04:46:30+5:302018-12-03T04:46:47+5:30