Lokmat Money > बिझनेस न्यूज > परकीय गुंतवणूकदारांना मुंबईतच हवा ‘आशियाना’; दोन वर्षांत प्रथमच भारतीय शहराचा समावेश

परकीय गुंतवणूकदारांना मुंबईतच हवा ‘आशियाना’; दोन वर्षांत प्रथमच भारतीय शहराचा समावेश

परकीय गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पसंती जपानची राजधानी टाेकियाेला दिली आहे. त्यानंतर सिंगापूर हे आवडते शहर ठरले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 11:11 AM2023-02-11T11:11:15+5:302023-02-11T11:13:55+5:30

परकीय गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पसंती जपानची राजधानी टाेकियाेला दिली आहे. त्यानंतर सिंगापूर हे आवडते शहर ठरले आहे.

Foreign investors want Ashiana in Mumbai Indian city included for the first time in two years | परकीय गुंतवणूकदारांना मुंबईतच हवा ‘आशियाना’; दोन वर्षांत प्रथमच भारतीय शहराचा समावेश

परकीय गुंतवणूकदारांना मुंबईतच हवा ‘आशियाना’; दोन वर्षांत प्रथमच भारतीय शहराचा समावेश


नवी दिल्ली : परदेशातील गुंतवणूकदारांना भारतातील रिअल इस्टेट क्षेत्र आकर्षित करते. आशिया आणि प्रशांत क्षेत्रातील आवडीच्या टाॅप टेन शहरांमध्ये मुंबईला स्थान मिळाले आहे. या यादीत मुंबई सातव्या स्थानावर आहे. गेल्या दाेन वर्षांमध्ये प्रथमच एका भारतीय शहराचा या यादीत समावेश झाला आहे. 
संपत्ती सल्लागार संस्था सीबीआरई इंडियाच्या ‘२०२३ आशिया प्रशांत गुंतवणूकदारांचे आकर्षण’ या अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे. या यादीत मुंबईने माेठ्या शहरांना मागे टाकले आहे. टाॅप टेनमध्ये भारतातील इतर काेणत्याही शहराला स्थान मिळालेले नाही. 

या शहरांना पसंती -
- परकीय गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पसंती जपानची राजधानी टाेकियाेला दिली आहे. त्यानंतर सिंगापूर हे आवडते शहर ठरले आहे.

- चीनमधील शांघाय हे शहर आठव्या, हनाेई नवव्या आणि दक्षिण काेरियाची राजधानी सेउल हे शहर दहाव्या स्थानी आहे. 

Web Title: Foreign investors want Ashiana in Mumbai Indian city included for the first time in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.