लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सरकारने उचललेल्या पावलांमुळे देशात स्टार्टअप कंपन्यांसाठी चांगले वातावरण निर्माण झाले असून, २०२३ मध्ये या कंपन्यांना चांगली थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) मिळेल, असे प्रतिपादन उद्योग तथा अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव अनुराग जैन यांनी केले आहे.
जैन यांनी सांगितले की, भारत हा जगातील तिसरा मोठा स्टार्टअप सुविधा असलेला देश आहे. कंपन्यांची कामगिरी पाहता भारत लवकरच अव्वल स्थानी येईल. स्टार्टअप कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ‘फंड ऑफ फंड्स आणि ‘स्टार्टअप इंडिया प्रारंभिक निधी योजना’ चांगले काम करीत आहे. त्यामुळे २०२३ मध्ये स्टार्टअप कंपन्यांना २०२३ मध्ये चांगला एफडीआय मिळू शकेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"