Join us

परकीय चलनाचा साठा 4 महिन्यांच्या उच्चांकावर, RBI गव्हर्नर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 9:49 PM

Foreign Reserves: देशातील परकीय चलनाच्या साठ्याने मोठी झेप नोंदवली आहे. पाहा RBI चा ताजा डेटा काय सांगतो...

Foreign Reserves: भारताकडे असलेल्या परकीय चलनाच्या साठ्याबाबत  रिझर्व्ह बँकेने महत्वाची माहिती दिली आहे. 1 डिसेंबर रोजी भारताकडे US $604 अब्ज परकीय चलनाचा साठा आहे. चार महिन्यांत पहिल्यांदाच हा साठा 600 अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे. यापूर्वी याच वर्षी 11 ऑगस्ट रोजी परकीय चलनाचा साठा 600 अब्ज डॉलरच्या गेला वर होता. 

$642 अब्ज ऑल टाईम हाय यापूर्वी 24 नोव्हेंबर रोजी परकीय चलनाचा साठा 597.93 अब्ज डॉलरवर होता. तर, ऑक्टोबर 2021 मध्ये देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याने $642 अब्ज डॉलर्सचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. यानंतर, मध्यवर्ती बँकेने गेल्या वर्षीपासून जागभरातील घडामोडींमुळे रुपयाला दबावापासून वाचवण्यासाठी या राखीव निधीचा वापर केला, ज्यामुळे परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली.

शक्तीकांत दास काय म्हणाले?शुक्रवारी डिसेंबरसाठी द्वि-मासिक चलनविषयक धोरण जाहीर करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, "1 डिसेंबर 2023 रोजी भारताचा परकीय चलन साठा $604 अब्ज होता. याद्वारे आपण आपल्या बाह्य वित्तपुरवठा गरजा सहज पूर्ण करू शकतो. यूएसमध्ये रोखे उत्पन्न वाढल्याने कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये भारतीय रुपयाची अस्थिरता इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या चलनांच्या तुलनेत कमी आहे."

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दासकेंद्र सरकार