नवी दिल्ली : विदेशात विमानतळांचे व्यवस्थापन आणि विकास सेवा सुरू करण्याची शक्यता भारतीय विमानतळ प्राधिकरण पडताळून पाहत आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे विमानतळ विकासाची क्षमता आहे. विमानतळ विकसित करण्यासह त्याचे व्यवस्थापन करण्याशिवाय आखाती देशांतील विमानतळाच्या विकासासाठीही या प्राधिकरणाने मदत केली आहे.
या क्षमतेचा उपयोग दुसऱ्या देशांतही करण्याचा आमचा मानस आहे, असे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे देशभरातील १२५ विमानतळांचे व्यवस्थापन आहे. यापैकी १८ विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा दिली जाते. अलीकडेच आम्ही भारतातील अनेक विमानतळांचे आधुनिकीकरण केले आहे. यात कोलकाता, चेन्नई, लखनौ, जयपूर आणि चंदीगडचा समावेश आहे. सध्या विदेशात जीएमआर आणि जीव्हीके समूह कार्यरत आहेत.
विदेशात सेवा; एएआयचा बेत
विदेशात विमानतळांचे व्यवस्थापन आणि विकास सेवा सुरू करण्याची शक्यता भारतीय विमानतळ प्राधिकरण पडताळून पाहत आहे
By admin | Published: August 6, 2015 10:27 PM2015-08-06T22:27:10+5:302015-08-06T22:27:10+5:30