Lokmat Money > बिझनेस न्यूज > विदेशी पर्यटकांत ३७ टक्क्यांची वाढ

विदेशी पर्यटकांत ३७ टक्क्यांची वाढ

ई-टुरिस्ट व्हिसा प्रणालीमुळे विदेशी पर्यटकांचे भारतातील आगमन सोपे झाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:31 AM2018-05-30T05:31:47+5:302018-05-30T05:31:47+5:30

ई-टुरिस्ट व्हिसा प्रणालीमुळे विदेशी पर्यटकांचे भारतातील आगमन सोपे झाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली

Foreign tourists increased by 37 percent | विदेशी पर्यटकांत ३७ टक्क्यांची वाढ

विदेशी पर्यटकांत ३७ टक्क्यांची वाढ

मुंबई : ई-टुरिस्ट व्हिसा प्रणालीमुळे विदेशी पर्यटकांचे भारतातील आगमन सोपे झाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत या वर्षी एप्रिल महिन्यात पर्यटकांची संख्या ३७.२ टक्के वाढली. ब्युरो आॅफ इमिग्रेशनच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.
विदेशातील पर्यटकांना विमानतळावर उतरताच, तत्काळ व्हिसा देण्याची सुविधा केंद्रीय पर्यटन विभागाने सुरू केली. यामुळे एप्रिल २०१८ मध्ये १.५७ लाख
विदेशी पर्यटक भारतात येऊ शकले. हा आकडा मागील वर्षी याच महिन्यात १.१४ लाख होता. जानेवारी ते एप्रिल दरम्यानही पर्यटकांच्या संख्येत ५७.२ टक्के वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान ९.१८ लाख पर्यटकांनी भारताला भेट दिली.

पर्यटकांचे ‘लॅण्डिंग’ दिल्लीतच
‘ई-टुरिस्ट व्हिसा’चा
उपयोग करून भारतात दाखल होणाऱ्या विदेशी पर्यटकांनी १५ विमानतळांचा उपयोग केला. पर्यटकांची सर्वाधिक
पसंती नवी दिल्लीला
होती. एकूण पर्यटकांपैकी
४६.२% पर्यटक नवी दिल्ली विमानतळावर उतरले. त्यानंतर, १७.४% पर्यटकांनी मुंबईला पसंती दिली. सर्वात कमी ०.४% पर्यटक कालिकत विमानतळावर उतरले.

पर्यटकांत ‘गोरा साब’ अव्वल
भारतात पर्यटनासाठी येणाºया १५ अव्वल देशांमध्ये ‘गोरा साब’ अशी ओळख असलेल्या ब्रिटिश पर्यटकांची
संख्या एप्रिल

2018
मध्ये सर्वाधिक होती.
एकूण पर्यटकांपैकी

16.3%
पर्यटक ब्रिटनचे होते. त्यानंतर अमेरिकेतील ११ व चीनमधील ५.८ टक्के पर्यटक भारतात आले.
सर्वात कमी १.८ टक्के पर्यटक दक्षिण
कोरियातील होते.

Web Title: Foreign tourists increased by 37 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.