Lokmat Money > बिझनेस न्यूज > Forex in India: मोदी सरकारला आर्थिक आघाडीवर मोठं यश, याबाबतीत बनवला नवा विक्रम

Forex in India: मोदी सरकारला आर्थिक आघाडीवर मोठं यश, याबाबतीत बनवला नवा विक्रम

Forex in India: कोरोनामुळे अर्थव्यवस्थेसमोर मोठं संकट निर्माण झालेलं असताना एका आर्थिक आघाडीवरून मोठी दिलासादायक बातमी आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 10:40 PM2021-07-09T22:40:36+5:302021-07-09T23:02:56+5:30

Forex in India: कोरोनामुळे अर्थव्यवस्थेसमोर मोठं संकट निर्माण झालेलं असताना एका आर्थिक आघाडीवरून मोठी दिलासादायक बातमी आली आहे

Forex in India: India's foreign exchange reserves cross ६ 610 billion mark | Forex in India: मोदी सरकारला आर्थिक आघाडीवर मोठं यश, याबाबतीत बनवला नवा विक्रम

Forex in India: मोदी सरकारला आर्थिक आघाडीवर मोठं यश, याबाबतीत बनवला नवा विक्रम

मुंबई - कोरोना विषाणूच्या साथीचा अर्थजगतावरही विपरित परिणाम झाला आहे. अनेक उद्योगधंदे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बंद पडल्याने केंद्र सरकारच्या तिजोरीत कराच्या माध्यमातून येणारा उत्पन्नाचा स्रोतही आटला आहे. (Forex in India) दरम्यान, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेसमोर मोठं संकट निर्माण झालेलं असताना एका आर्थिक आघाडीवरून मोठी दिलासादायक बातमी आली आहे. देशाकडील परकीय चलनाच्या साठ्यामध्ये अजून वाढ झाली आहे. २ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलनाचा साठा १.०१३ अब्ज रुपयांनी वाढून ६१०.०१२ अब्ज डॉलरच्या रेकॉर्ड पातळीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आज ही आकडेवारी प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. (India's foreign exchange reserves cross ६ 610 billion mark)

आरबीआयने दिलेल्या आकडेवारीनुसार २५ जून रोज समाप्त झालेल्या याआधीच्या आठवड्यामध्ये देशातील परकीय चलनाचा साठा ५.०६६ अब्ज डॉलर एवढा वाढून ६०८.९९९ अब्ज डॉलर एवढा झाला होता. आरबीआयच्या आकडेवारीनुसार १८ जूनला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यामध्ये ४ हजार ४१८ अब्ज डॉलरने घट होऊन तो ६०३.९३३ अब्ज डॉलर एवढा झाला होता. तत्पूर्वी ११ जून रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये परकीय चलनाचा साठा ३ हजार ०७४ अब्ज डॉलरने वाढून ६०८.०८१ अब्ज डॉलर या स्तरावर पोहोचला होता.

रिझर्व्ह बँकेच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार समीक्षाधीन आठवड्यामध्ये परकीय चलनाच्या साठ्यामध्ये वाढ होण्याचे कारण परकीय चलन संपत्ती म्हणजेच एफसीएमध्ये झालेली वाढ हे आहे. यादरम्यान, एफसीए ७४.८ कोटी डॉलरच्या वाढीसह ५६६.९८८ अब्ज डॉलर एवढा झाला आङे. डॉलरच्या तुलनेत सांगण्यात येणाऱ्या परकीय चलनाच्या संपत्तीमध्ये युरो, पौंड्स आणि येन यासारख्या अन्य परकीय चलनांच्या किमतीत झालेल्या घटीचा प्रभावही समाविष्ट आहे.

दरम्यान, आकडेवारीनुसार देशाकडील सोन्याच्या साठ्यामध्ये ७.६ कोटी डॉलरने वाढ होऊन ते ३६.३७२ अब्ज डॉलर एवढे झाले आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे उपलब्ध असलेल्या एसडीआर मध्ये ४.९ कोटी डॉलरने वाढ होऊन ते १.५४८ अब्ज डॉलर झाला आहे. यादरम्यान आयएमएफकडे असलेला भारताचा परकीय चलनाचा साठा १३.९ कोटी डॉलरनी वाढून ५.१०५ अब्ज डॉलर एवढा झाला आहे.  

Web Title: Forex in India: India's foreign exchange reserves cross ६ 610 billion mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.