Lokmat Money > बिझनेस न्यूज > चिनी मोबाइल विसरा; भारतातच वाढतेय उत्पादन

चिनी मोबाइल विसरा; भारतातच वाढतेय उत्पादन

Mobile News: मोबाइल निर्मितीला सरकारकडून प्रोत्साहन दिल्याचा परिणाम एकूण उत्पादनवाढीतून दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये देशात निर्माण झालेल्या मोबाइलचे एकूण मूल्य ४.१० लाख कोटी रुपयांचा घरात जाईल, असा अंदाज इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने (आयसीईए) वर्तवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 06:40 AM2024-04-04T06:40:42+5:302024-04-04T06:41:20+5:30

Mobile News: मोबाइल निर्मितीला सरकारकडून प्रोत्साहन दिल्याचा परिणाम एकूण उत्पादनवाढीतून दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये देशात निर्माण झालेल्या मोबाइलचे एकूण मूल्य ४.१० लाख कोटी रुपयांचा घरात जाईल, असा अंदाज इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने (आयसीईए) वर्तवला आहे.

Forget Chinese mobiles; Production is increasing in India | चिनी मोबाइल विसरा; भारतातच वाढतेय उत्पादन

चिनी मोबाइल विसरा; भारतातच वाढतेय उत्पादन

नवी दिल्ली - मोबाइल निर्मितीला सरकारकडून प्रोत्साहन दिल्याचा परिणाम एकूण उत्पादनवाढीतून दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये देशात निर्माण झालेल्या मोबाइलचे एकूण मूल्य ४.१० लाख कोटी रुपयांचा घरात जाईल, असा अंदाज इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने (आयसीईए) वर्तवला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मोबाईल उत्पादन १७ टक्क्यांनी अधिक असेल असेही आयसीईएने म्हटले आहे.
संघटनेकडून सध्या या आर्थिक वर्षातील आकडेवारी संकलित करण्याचे काम सुरु आहे. या   वर्षभरात देशांतर्गत बाजारात मोबाईल फोनची संख्यात्मक विक्री मात्र त्या प्रमाणात वाढलेली नाही.

निर्यात ३३% वाढली
या काळात सुमारे १,२०,००० कोटी रुपयांच्या मोबाईलची निर्यात झाली. गेल्या वर्षी ९० हजार कोटी रुपयांच्या मोबाइलची निर्यात झाली होती. निर्यातीचे प्रमाण ३३ टक्क्यांनी वाढले आहे. निर्यात झालेल्या मोबाइलचे प्रमाण एकूण उत्पादनाच्या २५ टक्के इतके होते. सरकारने सरकारने आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत मोबाइल निर्यात ५२ ते ५८ अब्ज डॉलर्सच्या घरात नेण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.

Web Title: Forget Chinese mobiles; Production is increasing in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.