Join us  

१६७ रुपयांत महिन्याला ३०० एमबीपीएसचा स्पीड देतेय ही कंपनी, Jio आणि Airtel विसरून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 1:01 PM

जर तुम्ही घरी नवीन ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.

Excitel 300Mbps Plan:  जर तुम्ही घरी नवीन ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या विद्यमान ब्रॉडबँड ऑपरेटरकडून जास्त पैसे आकारले जाण्याची भीती वाटत असेल, तर एका कंपनीनं स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन्स आणला आहे. Excitel ने आपल्या ग्राहकांसाठी 300Mbps च्या सुपर फास्ट स्पीडसह स्वस्त ब्रॉडबँड योजना आणली आहे. जर तुम्हाला जास्त स्पीड हवा असेल आणि जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्हाला हा प्लॅन आवडू शकतो.

मर्यादित काळासाठी आणलेल्या या ऑफरची किंमत फक्त 167 रुपये प्रति महिना आहे. पण या प्लॅनसोबत एक छोटीशी अट अशी आहे की हा प्लॅन किमान तीन महिन्यांसाठी घ्यावा लागेल. म्हणजे 3 महिन्यांसाठी 165 रुपये प्रति महिना दराने तुम्हाला 501 रुपये द्यावे लागतील. या किमतीत GST समाविष्ट नाही, याचा अर्थ तुमच्याकडून यावर जीएसटीदेखील आकारला जाईल. पण एक गोष्ट चांगली आहे की कंपनी नवीन ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचे इन्स्टॉलेशन चार्ज घेत नाही. परंतु कंपनी ONU डिव्‍हाइससाठी त्‍याच्‍या ग्राहकांकडून 2000 रुपये रिफंडेबल डिपॉझिट घेते. 3 महिन्यांनंतर, ग्राहकांना कंपनीकडे उपलब्ध असलेल्या 300 एमबीपीएस प्लॅनमधून निवड करावी लागेल.

कोणाला मिळेल फायदा?कंपनीकडून देण्यात येणारी ही लिमिटेड बोर्डिंग ऑफर आहे. याचा अर्थ या ऑफरचा लाभ जुन्या ग्राहकांना घेता येणार नाही. या ऑफरचा लाभ केवळ नव्या ग्राहकांना मिळेल.

300 एबीपीएस प्लॅन्स300 एमबीपीएसचा प्लॅन जर तुम्ही 3 महिन्यांसाठी घेतला तर तुम्हाला महिन्याचा खर्च 667 रुपये येतो. जर तुम्ही सहा महिन्यांसाठी हा प्लॅन घेतला तर त्यासाठी प्रति महिना 635 रुपये, 9 महिन्यांसाठी घेतला तर प्रति महिना 565 रुपये आणि वर्षभरासाठी प्लॅन घेतला तर प्रति महिना तुम्हाला 530 रुपये खर्च येईल. दरम्यान, एक महत्त्वाची बाब म्हणजे ही ऑफर मुंबईत राहणाऱ्या ग्राहकांसाठीच आहे. एअरटेलच्या 300 एमबीपीएसच्या प्लॅनची किंमत 1498 रुपये आहे आणि जिओ फायबरच्या या प्लॅनची किंमत 1499 रुपये आहे.

टॅग्स :इंटरनेटमुंबई