Join us  

ATM Card विसरलात किंवा चुकीच्या पिनमुळे ट्रान्झॅक्शन रिजेक्ट झालं? नो टेन्शन; पाहा कार्डलेस विड्रॉलची पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 12:12 PM

Withdraw Money without ATM: तुम्हाला रोख रकमेची गरज आहे आणि तुम्ही एटीएम कार्ड सोबत आणायला विसरला आहात किंवा डेबिट कार्ड आहे, पण चुकीचा पिन टाकल्यामुळे ट्रान्झॅक्शन रिजेक्ट झालं, तर तुम्हाला पैसे कसे काढता येतील हे जाणून घेऊ.

Withdraw Money without ATM: आजच्या काळात यूपीआयमुळे रोखीचे व्यवहार कमी झाले असले तरी ते पूर्णपणे थांबलेले नाहीत. असे अनेक लोक आहेत जे अजूनही अनेक कामं रोख रकमेच्या माध्यमातून करतात. रोख रकमेची गरज भागविण्यासाठी बहुतांश लोक बँकेच्या एटीएममध्ये जाऊन डेबिट कार्डद्वारे पैसे काढतात. 

पण समजा तुम्हाला रोख रकमेची गरज आहे आणि तुम्ही एटीएम कार्ड सोबत आणायला विसरला आहात किंवा तुमच्याकडे डेबिट कार्ड आहे, पण चुकीचा पिन टाकल्यामुळे ट्रान्झॅक्शन रिजेक्ट झालं, तर तुम्ही काय कराल? अशावेळी तुम्ही एटीएममधून तुमचे पैसे अगदी सहज काढू शकता. डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढायचे ते आज जाणून घेऊ. 

काय आहे पद्धत? 

यूपीआयच्या माध्यमातून एटीएम कार्डशिवाय पैसे काढता येतात. याचा फायदा घेण्यासाठी एटीएम कॅश विड्रॉल सिस्टीम इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉल (आयसीसीडब्ल्यू) मध्ये अपग्रेड करण्यात आली आहे. याच्या मदतीने तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर न करता एटीएममधून पैसे काढू शकता. पण त्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये भीम, पेटीएम, जीपे, फोनपे असे यूपीआय अशी अॅप असणं आवश्यक आहे. 

कार्डलेस पैसे कसे काढावे? 

  • सर्वप्रथम एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याचा पर्याय निवडावा.
  • पैसे काढण्याचा पर्याय निवडल्यानंतर एटीएम स्क्रीनवर यूपीआय पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर एटीएम स्क्रीनवर क्यूआर कोड दिसेल.
  • तुमच्या फोनमध्ये यूपीआय पेमेंट अॅप ओपन करा आणि क्यूआर स्कॅनर कोड ऑन करा आणि क्यूआर कोड स्कॅन करा.
  • स्कॅन केल्यानंतर रक्कम निवडा, प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करा.
  • दरम्यान, तुम्हाला यूपीआय पिन टाकावा लागेल आणि नंतर कॅश ट्रान्झॅक्शन करावं लागेल.
  • ही सुविधा देशात सर्वत्र आठवड्यातील ७ दिवस २४ तास उपलब्ध आहे.
टॅग्स :बँकपैसा